Magh Pournima 2024 :  माघ  पौर्णिमेला (Magh Pournima )  देव स्नानासाठी पृथ्वीवर येतात असे मानले जाते. माघ पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे, त्याच प्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी दानालाही अधिक महत्त्व आहे. या दिवशी देवी-देवतांचा पृथ्वीवर वास असतो, अशी धार्मिक मान्यता आहे. माघ पौर्णिमेला स्नान केल्यानंतर देव परत कधी जातात या विषयी आपण जाणून घेणर आहे.

सनातन हिंदू धर्मामध्ये आमवस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व असते. त्यात पौर्णिमेचे व्रत अनेक पुरुष आणि महिला करत असतात. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व असते. त्यात माघ पौर्णिमेला अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण या माघ पौर्णिमेला भगवान विष्णू स्वत: गंगा नदीमध्ये स्थायी रुपात असते. प्रत्यक्ष देव या महिन्यात भूतलावर निवासासाठी येतात आणि महिनाभर नदीमध्ये स्नान करतात. त्यामध्ये तीर्थराज प्रयाग, काशी अशा ठिकाणी ते निवास करतात. माघ महिन्यातील स्नानाला विशेष महत्त्व असते. माघ पौर्णिमेला माघ स्नानाची समाप्ती होते. त्यानंतर देवी देवता परत माघ पौर्णिमेला स्नान केल्यानंतर स्वर्गात जातात, असे शास्त्रात सांगितले जाते. 

माघ पौर्णिमेला कुठे स्नान करावे?

काशी, प्रयाग, हरिद्वार येथील गंगा नदीत माघ स्नान केले पाहिजे. जर माघ पौर्णिमेला हे शक्य नाही झाले तर नदीच्या त्रिवेणी संगमावर स्नान  किंवा आपल्या घराच्या पाण्यात गंगाजल घेऊन ते पाण्यात टाकून स्नान कराव. स्नान करताना नदीची नावे घ्यायची आहेत. स्नान हे ब्रह्ममुहूर्तावर करावे. स्नान झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे त्यानंतर तुळशीला जल किंवा दूध अर्पण करावे.  नदीला दीपदान करावे. 

माघ महिन्यात करायचे उपाय

माघ महिन्यात तिळाला महत्त्व असते. स्नान झाल्यानंतर देवाला तिळाचे आणि गोड पदार्थ करावेत. माघ पौर्णिमेला स्नान केल्यानंतर धनलाभ होतो. तसेच मोक्ष दखील प्राप्त होतो. ज्यांचे विवाह जमत नाही त्यांनी हे व्रत केल्यास लवकरच विवाहयोग जुळून येईल. तसेच घरात भरभराटी येईल. सौभाग्यवाती स्त्रीयांनी सूर्य देवाला अर्घ्य द्यावे. दिवसभर माता लक्ष्मीची पूजा करावी. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हे ही वाचा :