Galaxy AI Feature : आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI टेक्नॉलॉजीचे (AI Technology) नाव गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. खरंतर, AI द्वारे, अनेक लोकांच्या कामाची पद्धत अधिक साधी, सोपी, सरळ आणि अचक व्हावीत हा यामागचा ट्रेंड आहे. म्हणून या वैशिष्ट्याचा ट्रेंड वेगाने वाढतोय. सॅमसंगने (Samsung) आपल्या नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये AI फीचर सादर केली आणि Galaxy AI फीचर नावाने लॉन्च केली. सॅमसंग ने Galaxy S24 सीरीज स्मार्टफोनमध्ये Galaxy AI फीचर आणले होते. पण, आता कंपनी हे फीचर आपल्या इतर डिव्हाईसमध्ये सुद्धा सादर करणार आहे.
Samsung च्या Galaxy AI चे फीचर्स
Samsung ने 17 जानेवारी 2024 रोजी कॅलिफोर्नियातील SAP सेंटर येथे आयोजित गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंट दरम्यान Samsung Galaxy S24 सीरिज लॉन्च केली, ज्यामध्ये कंपनीने तीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. यामध्ये Samsung Galaxy S24, Samsung Galaxy S24 Plus, Samsung Galaxy S24 Ultra यांचा समावेश आहे. सॅमसंगने या तिन्ही स्मार्टफोनमध्ये AI फीचर्स दिले आहेत.
'या' डिव्हाईसमध्ये उपलब्ध असेल
नुकतीच सॅमसंग कंपनीने अशी घोषणा केली आहे की, ते OneUI 6.1 अपडेटद्वारे त्याच्या इतर काही स्मार्टफोन आणि टॅब्लेटमध्ये AI फीचर्स देखील सादर केली आहेत. या डिव्हाईसच्या नावांमध्ये Galaxy S23 सीरिज, Galaxy S23 FE, Samsung Galaxy Z Fold 5, Samsung Galaxy Z Flip 5 आणि Samsung Galaxy Tab S9 Series यांचा समावेश आहे. कंपनीच्य म्हणण्यानुसार, या वर्षाच्या मार्चपासून या डिव्हाईसमध्ये AI फीचर्स आणण्यास सुरुवात करणार आहे.
AI फीचर्सचं वैशिष्ट्य काय?
Galaxy AI फीचर्सच्या माध्यमातून यूजर्स लाईव्ह ट्रान्सलेशन, चॅट असिस्ट फीचर्स, सर्कल टू सर्च फीचर यांसारख्या अनेक स्पेशल फीचर्सचा लाभ आणि आनंद घेऊ शकतात. सॅमसंगने सध्या Galaxy AI मध्ये काही निवडक खास फीचर्स समाविष्ट केले आहेत. पण, कंपनीनेे असा दावा केला आहे की, Galaxy AI च्या फीचर्स हळूहळू अॅडव्हान्स करतील. याशिवाय, सॅमसंग आगामी काळात त्याच्या इतर गॅलेक्सी डिव्हाईसमध्ये AI फीचर्स देखील समाविष्ट करू शकते. Galaxy AI फीचर्सच्या माध्यमातून यूजर्स लाईव्ह ट्रान्सलेशन, चॅट असिस्ट फीचर्स, सर्कल टू सर्च फीचर यांसारख्या अनेक स्पेशल फीचर्सचा लाभ आणि आनंद घेऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या :