Magh Poornima 2025: सनातन धर्मात पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी काही खास उपाय केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे सुख-समृद्धी मिळते. यंदा माघ पौर्णिमेचे महत्त्व अधिकच वाढलंय. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून उपवास केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात आनंद मिळतो, असे म्हटले जाते. जाणून घ्या


माघ पौर्णिमेचा शुभ मुहूर्त


वैदिक दिनदर्शिकेनुसार माघ पौर्णिमा 11 फेब्रुवारीला संध्याकाळी 6:50 पासून सुरू होईल आणि 12 फेब्रुवारीला संध्याकाळी 7:20 पर्यंत राहील. सनातन धर्मात उदय तिथी अधिक महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे 12 फेब्रुवारी 2025 रोजी माघ पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या काळात ब्रह्म मुहूर्त पहाटे 5.19 ते 6.10 पर्यंत आहे. 


सुख, शांती, ऐश्वर्य, समृद्धी आणि प्रगतीसाठी माघ पौर्णिमेला काय कराल?



  • शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, माघ पौर्णिमेच्या दिवशी लवकर उठून ब्रह्म मुहूर्तावर स्नान करावे. 

  • शक्य असल्यास पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने अनेक जन्मांची पापे नष्ट होतात. 

  • जर आपण या काळात उपवास आणि उपासना पद्धतीबद्दल बोललो तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा विधीनुसार करा. 

  • लाल कपडा पसरून भगवान विष्णूची मूर्ती स्थापित करा. 

  • देवी लक्ष्मीला फुलांचा हार अर्पण करा

  • लक्ष्मीला देशी तुपाचा दिवा लावा

  • घरात सकारात्मक ऊर्जा पसरवा.

  • विष्णु सहस्रनामाचे पठण करा आणि विधीनुसार आरती करा, त्यानंतर भोग अर्पण करा 

  • जीवनात सुख, शांती, ऐश्वर्य, समृद्धी आणि प्रगतीसाठी देवाची प्रार्थना करा. 


माघ पौर्णिमेचे महत्त्व जाणून घ्या..



  • या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने सर्व वाईट कर्मे नष्ट होतात. 

  • देवी लक्ष्मीची पूजा केल्याने धन आणि सुख मिळते, 

  • धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने मोक्ष प्राप्त होतो. 

  • विष्णु सहस्त्रनामचे पठण मनाला शांत करते आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित करते. 

  • म्हणजेच माघ पौर्णिमेचा हा पवित्र सोहळा जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणण्याची सुवर्णसंधी आहे. 

  • तुम्हालाही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर या दिवशी पूजा आणि व्रत करा.


हेही वाचा>>>


Astrology: मार्च महिन्यात 'या' 5 राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार भूकंप? शुक्राचा अस्त, जीवनात समस्या निर्माण होणार, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


ब्रेकिंग तसेच ताज्या बातम्यांसाठी पाहा...