Magh Gupt Navratri 2024 : माघ (Magh) महिन्याची गुप्त नवरात्री यंदा 10 फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. विशेष सिद्धी प्राप्त करण्यासाठी या नवरात्रीमध्ये गुप्त रुपाने पूजा पाठ केला जातो. या कालावधीत संपूर्ण 9 दिवस भक्त दुर्गेच्या 9 रूपांची भक्तिभावाने पूजा करतात. या कालावधीत ‘गुप्त’ रूपाने पूजापाठ केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. 18 फेब्रुवारीला गुप्त नवरात्री समाप्त होईल. या दरम्यान काही कामं केल्याने देवीची विशेष कृपा प्राप्त होते, मात्र यादरम्यान काही चुका देखील टाळल्या पाहिजे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.


गुप्त नवरात्रीदरम्यान करा ‘ही’ कामं



  • गुप्त नवरात्रीच्या काळात कर्जातून मुक्त होण्यासाठी देवी दुर्गेसमोर धूप प्रज्वलित करावा, यामुळे कर्जातून मुक्ती मिळते.

  • गुप्त नवरात्रीत देवी लक्ष्मीची पूजा करताना तिला कमळाचं फूल अर्पण करावं. तुमच्याकडे कमळाचं फूल नसल्यास तुम्ही कमळाच्या फुलाचा फोटो देखील ठेवू शकता, असं केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होईल.

  • जर तुम्ही गुप्त नवरात्रीत सोन्याचे किंवा चांदीचे नाणे घरी आणले, तर देवी लक्ष्मी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. हे नाणे आपल्या घरात संपत्ती, आनंद आणि समृद्धी आणते.

  • माघी नवरात्रीदरम्यान, दुर्गा देवीला लाल फुलं अर्पण करावीत. जर तुमच्या घरात कोणी आजारी असेल, तर ते बरे होतील. त्याचबरोबर ‘ऊं क्रीं कालिकायै नम:’ या मंत्राचा जप देखील करावा, यामुळे घरातील व्यक्तीला देवीचा आशीर्वाद मिळतो.

  • या नवरात्रीच्या काळात घरात मोराचं पीस आणणं अतिशय शुभ मानलं जातं. मोर हे लक्ष्मी देवीचं वाहन आहे. घरी मोराचं पीस आणल्याने तुमच्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते.


चुकूनही करू नका ‘ही’ कामं



  • नवरात्रीच्या काळात सर्वांशी चांगलं वागा. कोणालाही तुच्छ लेखू नका, वाईट बोलू नका.

  • या काळात केस कापू नका, दाढी करू नका किंवा आपली नखं देखील कापू नका.

  • देवीच्या पूजेच्या वेळी लाल, पिवळे, शुभ्र कपडे घाला, काळे कपडे घालू नका.

  • नवरात्रीच्या काळात मांस, दारू आणि धुम्रपान टाळा.

  • या दिवसांत कोणत्याही प्रकारचा हिंसाचार करु नका.

  • नवरात्रीच्या काळात कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नका. हिंदू धर्मात कन्येला देवीप्रमाणे मानलं जातं.

  • तुमची उपासना पूर्णपणे गुप्त ठेवा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Magh Maas 2024 : शनिवारपासून माघ मासारंभ; या महिन्यात असणार 'हे' महत्त्वाचे सण, फलप्राप्तीसाठी करा खास उपाय