Chandra Grahan 2022 : या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण (Surya Grahan 2022) 25 ऑक्टोबर रोजी झाले, तर दुसरीकडे या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण देखील 8 नोव्हेंबरला म्हणजेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण वृश्चिक राशीत झाले. ते जरी आंशिक सूर्यग्रहण असले तरी शेवटचे चंद्रग्रहण वृषभ राशीत असेल. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहण ही एक विशेष घटना मानली जाते. त्याच वेळी, पौराणिक ग्रंथांनुसार, जेव्हा आकाशात चंद्रग्रहण होते तेव्हा त्याचा संपूर्ण प्रभाव पृथ्वीवर पडतो. एवढेच नाही तर कोणत्याही ग्रहणाचा परिणाम सर्व राशींवर नक्कीच होतो.


2022 मध्ये 4 ग्रहणे


ज्योतिषशास्त्रानुसार 2022 मध्ये 4 ग्रहणे होणार आहेत, ज्यामध्ये 2 चंद्रग्रहण आणि 2 सूर्यग्रहण आहेत. आतापर्यंत पहिले सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण झाले आहे. या क्रमाने आता दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या राशींवर या चंद्रग्रहणाचा सर्वाधिक परिणाम होईल.


मेष
वर्षाच्या शेवटच्या सूर्यग्रहणाचा प्रभाव मेष राशीसाठी काही नकारात्मक परिणाम आणू शकतो. याच्या प्रभावामुळे मेष राशीला धनहानीसोबतच काही आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते.


वृषभ
वृषभ राशीसाठी चंद्रग्रहण संमिश्र परिणाम आणेल. या राशीला धनसंपत्तीचे संकेत मिळत असले तरी शिक्षणावर काही नकारात्मक परिणाम होऊ शकतात. स्पर्धा परीक्षेत बसलेल्यांना नापास होण्याची शक्यता आहे.


मिथुन
मिथुन राशीसाठी चंद्रग्रहण शुभ संकेत देत आहे. तुम्ही पैसे कमवू शकता आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला चांगली नोकरी देखील मिळू शकते किंवा चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे तुमची बढती होण्याची शक्यता आहे.


कर्क
वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण कर्क राशीसाठी त्रासदायक असू शकते. चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांना नोकरीमध्ये काही अडचणी येऊ शकतात. या चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे कर्क राशीच्या लोकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.


सिंह 
सिंह राशीच्या लोकांसाठी, चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे, वैवाहिक आणि प्रेम संबंध मजबूत होण्याचे संकेत आहेत. एखाद्या ठिकाणी लग्नाची चर्चा सुरू असेल तर लवकरच लग्न होऊ शकते.


कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण संमिश्र परिणाम देणार आहे. या लोकांना नोकरीत बढती मिळू शकते, तर कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होण्याची चिन्हे आहेत. शुभ चिन्ह म्हणून या राशीचे लोक नवीन घर खरेदी करू शकतात.


तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी आर्थिक नुकसान होण्याची चिन्हे आहेत. शहाणपणाने पैसा खर्च केला नाही तर मोठे नुकसान होऊ शकते.


वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण शुभ असू शकते. तुम्हाला संतती सुख मिळण्याची शक्यता आहे किंवा मुलांसाठी काही चांगली बातमी मिळू शकते.


धनु
धनु राशीच्या लोकांना चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे नोकरीत चढ-उतार पहावे लागू शकतात. सहकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण करा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


संबंधित बातम्या


Chandra Grahan 2022: देव दिवाळीला चंद्रग्रहण होईल, राहू-केतूचे दुष्परिणाम टाळण्यासाठी करा 'हे' उपाय