Lucky Zodisc Sign: 13 जून तारीख सोनेरी! गजकेसरी योगामुळे 'या' 5 राशींच्या नशीबी श्रीमंतीचे योग, कुबेराची कृपेने तिजोरी भरेल पैशांनी

Lucky Zodisc Sign: ज्योतिषशास्त्रानुसार, 13 जून रोजी ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे गजकेसरी योग निर्माण होईल. ज्यामुळे 5 राशींचं आयु्ष्य सोन्यासारखं चमकेल.

Continues below advertisement

Lucky Zodisc Sign:  घरात लक्ष्मी नांदावी, सुख-समृद्धी यावी यासाठी अनेक जण मेहनत, कष्ट घेताना दिसतात. पण काही वेळेस कष्ट करूनही नशीब साथ देत नाही. अशावेळी नशीबासोबत ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीदेखील आपल्या आयुष्यात महत्त्वाची ठरते. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा तुमच्या पत्रिकेत ग्रहांची स्थिती उत्तम असेल, तेव्हा सगळ्या अडचणी आपोआप सुटत जातात. ग्रह-ताऱ्यांच्या हालचालींमुळे निर्माण होणारे शुभ योग व्यक्तीला रंकाचा राजा बनवू शकतात. ज्योतिषशास्त्रात गजकेसरी हा एक महत्त्वाचा योग मानला जातो. त्याच्या प्रभावामुळे व्यक्तीला आर्थिक लाभ, करिअरमध्ये यश आणि व्यवसायात इच्छित नफा मिळतो. हा योग गुरु आणि चंद्रामुळे तयार होत असल्याने, व्यक्तीला धन, करिअरमध्ये प्रगती, समाजात आदर, वैवाहिक सुख आणि मानसिक शांती मिळते. त्याचबरोबर, हा राजयोग जून महिन्यात तयार होत आहे, ज्यामुळे अनेक राशींना शुभवार्ता मिळू शकते. सविस्तर जाणून घ्या..

Continues below advertisement

गजकेसरी योगामुळे 'या' 5 राशींचे नशीब चमकणार..

ज्योतिषशास्त्रानुसार, मनाचा कारक चंद्राने 11 जून रोजी रात्री 8:10 वाजता धनु राशीत प्रवेश केलाय. ज्योतिषांच्या मते, चंद्र हा 13 जूनपर्यंत या राशीत राहील. अशा परिस्थितीत, जेव्हा चंद्र धनु राशीत येईल, तेव्हा चंद्र आणि गुरु यांच्यात संसप्तक संबंध निर्माण होईल, ज्यामुळे गजकेसरी योग होईल. अशा परिस्थितीत, काही राशींना करिअरमध्ये प्रगती आणि तणावातून मुक्तता मिळू शकते. या राशींची नावे जाणून घेऊया.

तूळ

ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीच्या लोकांना गजकेसरी राजयोगामुळे करिअरमध्ये चांगले परिणाम मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी वेळ शुभ राहील. कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. हा काळ करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा असेल. तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल, ज्यामुळे आराम आणि विलासाच्या वस्तू वाढतील. कामाच्या ठिकाणी यशाचा काळ राहील. या काळात व्यवसायात चांगला नफा झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. योगाच्या प्रभावामुळे कोणताही दीर्घकाळापासूनचा आजार बरा होईल. कोर्टाच्या खटल्यांमधून सुटका मिळण्याची शक्यता आहे.

धनु

ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीच्या लोकांना नवीन नोकरीच्या संधी मिळतील. तुमच्या प्रियजनांसोबत बाहेर प्रवास करण्याची संधी मिळेल. तुमच्या मेहनतीमुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी आदर मिळू शकेल. अचानक आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. यावेळी व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायात फायदा होईल. विद्यार्थी त्यांच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करतील आणि यश मिळवतील. कामाच्या ठिकाणी आदर आणि यश मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नुकतेच नोकरीत पाऊल ठेवले असेल तर तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते.

कुंभ

ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग तुमचा आनंद वाढवू शकतो. तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांच्या योगाच्या प्रभावामुळे त्यांची इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात सुरू असलेल्या समस्या दूर होतील. तुम्हाला गुंतवणुकीद्वारे पैसे मिळतील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकेल. तुमची कला चमकेल आणि इतरांसमोर येईल. योगाच्या प्रभावामुळे तुमचे आकर्षण अधिक मजबूत होईल.

हेही वाचा :

Ketu Transit: 2026 पर्यंत 'या' 3 राशी राहतील टेन्शन फ्री! केतू करणार चमत्कार, नोकरी असो, लग्न असो की पैसा, नशीबाची साथ मिळत राहणार..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola