Premanand Maharaj : सोशल मीडियावर सध्या प्रेमानंद महाराजांचे (Premanand Maharaj) अनेक व्हिडीओ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना आपल्याला दिसतात. यामध्ये ते सत्संग तसेच, लोकांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर देण्याचा, त्यांचं समर्थन करण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रश्न त्यांच्या एका भक्ताने त्यांना विचारला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
प्रेमानंद महाराजांना एका भक्ताने विचारलेला प्रश्न असा होता की, देव खरंच नैवेद्य खातात की नाही? यावर प्रेमानंद महाराजांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, मानवी शरीर हे पाच तत्वांनी मिळून बनलं आहे. ज्यामध्ये जल (पाणी), भूमी, आकाश, वायु आणि अग्नीचा समावेश आहे. त्यामुळेच मानव हवा, प्रकाशासह अन्न आणि जलसुद्धा ग्रहण करतात.
पण, देव आपलं दैवत हे तीन प्रमुख तत्त्वांनी बनलं आहे. यामध्ये जल आणि पृथ्वीचा समावेश नसतो. त्यामुळे देव सरळ मार्गाने जल किंवा अन्न ग्रहण करत नाहीत. पण, देवाचं शरीर हे वायुमय आणि प्रकाशमय आहे. त्यामुळेच ते वायू रुपाने गंध, प्रकाशाच्या माध्यमातून प्रकाश, ऊर्जा आणि आकाशाच्या माध्यमातून शब्द किंवा ध्वनी ग्रहण करतात.
त्यामुळेच जेव्हा कोणी भक्त भोजनाच्या माध्यमातून नैवेद्य दाखवतात तेव्हा त्याच्या गंधाला वायुरुपाने देव ग्रहण करतात. त्यानेच त्यांची तृप्ती होते.
'या' फळांचा नैवेद्य देवाला दाखवू नका
प्रेमानंद महाराज पुढे म्हणतात की, देवाला नैवेद्यात कधीही कांदा, लसूण यांचा नैवेद्य दाखवू नये. अशा वेळी त्याच्या साली काढून तो दाखवावा. तसेच, आंब्याचा नैवेद्य दाखवत असाल तर त्याच्या साली काढून दाखवावा. तसेच, ज्या फळांना बिया असतात अशा फळांचा नैवेद्य देवाला दाखवू नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :