Lucky Zodiac Signs On 26 September 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 26 सप्टेंबरचा दिवस म्हणजेच शुक्रवारचा दिवस आहे. हा दिवस देवी लक्ष्मीला (Lord Lakshmi) समर्पित आहे. ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींनुसार, उद्याचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे उद्या कोणत्या 5 राशींना लाभ मिळणार आहे. हा दिवस कोणत्या राशींसाठी लकी असणार आहे? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी उद्याचा दिवस फार खास असणार आहे. मित्रांबरोबर तुमचा वेळ फार चांगला जाईल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीत प्रमोशन मिळू शकतं. तसेच, आजच्या दिवसात कोणाशीही वाद घालताना सांभाळून वाद घाला. देवी लक्ष्मीची विशेष कृपा राहील.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी उद्याचा दिवस फार लाभदायी असणार आहे. तुम्हाला जर नवीन प्रोजेक्टवर काम करायचं असेल तर त्यासाठी हा दिवस फार शुभ असणार आहे. नवीन गोष्टींची ओळख होईल. तसेच, नकरात्मक गोष्टींपासून तुम्ही फार दूर राहाल. मित्रांच्या सहयोगाने तुम्हाला तुमची कामे पूर्ण करता येतील. आपापसांतील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करा.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन गोष्टी शिकण्याची संधी चालून येईल. तुमच्या मार्गातील सगळे अडथळे हळुहळू दूर होतील. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. मित्रांच्या सहकार्याने तुम्हाला तुमची कामे पूर्ण करता येतील. नशिबाची साथ तुमच्याबरोबर असणार आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी उद्याचा दिवस फार सकारात्मक असणार आहे. तुम्ही नियोजित केलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. तसेच, तुमचं आरोग्य देखील पूर्वीपेक्षा चांगलं असणार आहे. कुटुंबातील सदस्यांबरोबर तुम्ही लवकरच फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. घरातील वातावरण आनंदी असणार आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी उद्याचा दिवस फार खास असणार आहे. देवीची तुमच्यावर विशेष कृपा असेल. तसेच, तुमच्या हातून एखादं चांगलं कार्य घडेल. लवकरच तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. या काळात घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)