Abhinav Kashyap On Salman Khan: 'दबंग' (Dabang Movie) आणि 'बेशरम' सारख्या सुपरस्टार चित्रपटांचा दिग्दर्शक अभिनव कश्यप (Abhinav Kashyap) सध्या सलमान खानबद्दलच्या (Salman Khan) वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. त्यानं यापूर्वी एका मुलाखतीत सलमान खानला गुंड म्हटलं होतं आणि त्याच्या कुटुंबावरही अनेक गंभीर आरोप केलेले. आता त्यानं पुन्हा एकदा सलमान खानवर जहरी टीका केली आहे.
अभिनव कश्यप हा दिग्दर्शक अनुराग कश्यपचा (Anurag Kashayp) भाऊ आहे. अनुरागचा 'निशांची' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननं या सिनेमाचं कौतुक केलं आणि त्यासोबतच अनुराग कश्पवरही स्तुतीसुमनं उधळली आहेत. याबाबत बोलताना अभिनव कश्यपनं सलमान खानवर जोरदार टीका केली आहे.
बॉलिवूड ठिकाणाशी बोलताना अभिनव कश्यपनं सलमान खानवर टीकास्त्र डागलं. अभिनव कश्यपनं सलमान खाननं जे अनुराग कश्यपचं कौतुक केलं, त्याला एक प्रकारचा कव्हर-अप असल्याचं म्हटलं आहे. अभिनव कश्यप म्हणाला की, "मी त्याच्याबद्दल वक्तव्य केल्यामुळे सलमान खान आम्हाला पाठींबा देत असल्याचं दाखवत आहे. हे सलमान खानच्या नशीबात लिहिलंय की, 'वह हमारे जूते चाटेंगे' (हिंदीतली म्हण आहे, चापलूसी करणं हा त्याचा अर्थ होतो.) फक्त बसा आणि वाट पहा."
सलमान खाननं केलं अनुराग कश्यपचं कौतुक, भाऊ अभिनव कश्यपचा संताप
अभिनव कश्यपनं सलमान खाननं अनुराग कश्यपचं कौतुक का केलं? हे स्पष्ट केलं आहे. दिग्दर्शकाच्या मते, "कदाचित तो माझ्या भावाच्या माध्यमातून मला गप्प करू इच्छितो. कदाचित त्याला वाटलं असेल की, अनुराग माझ्याशी बोलेल आणि मला गप्प राहायला सांगेल. म्हणूनच तो माझ्या भावाच्या चित्रपटाचं कौतुक करतोय आणि त्याची प्रशंसा करतोय. असंच करुन प्रतिभा नसलेले लोक आयुष्यात पुढे जातात..."
दरम्यान, सलमान खानचा गाजलेला सिनेमा 'तेरे नाम'शी अनुराग कश्यप जोडला गेलेला. पण, नंतर त्याला काढून टाकण्यात आलं. एका मुलाखतीत बोलताना अनुराग कश्यपनं खुलासा केलेला की, त्यांनी त्यांनी सलमानला छातीवरचे केस वाढवायला सांगितले होते, जे निर्मात्याला आवडलं नाही. त्यानंतर ते आजतागाय सलमानला भेटलेले नाहीत. दरम्यान, त्यांनी स्पष्ट केलं की, त्यांना काढून टाकण्यात आलं नव्हतं, त्यांनी स्वतःहून चित्रपट सोडलेला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :