Lucky Zodiac Signs On 23 December 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, 23 डिसेंबर 2025 (December 2025) चा दिवस फार खास असणार आहे. कारण उद्या विनायक अंगारक चतुर्थी आहे. या दिवशी लाडक्या बाप्पाची पूजा केली जाते. तसेच, ग्रह-नक्षत्रांच्या चालीनुसार देखील उद्याचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. अशा वेळी कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) उद्याचा दिवस लकी असणार आहे ते जाणून घेणार आहोत. 

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी उद्याचा दिवस फार लाभदायक असणार आहे. या राशीच्या लोकांवर गणरायाची विशेष कृपा असेल. तसेच, तुमच्या सुख-संपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, नात्यात गोडवा पाहायला मिळेल. तसेच, प्रॉपर्टीच्या संबंधित तुम्हाला चांगला लाभ मिळेल. मित्र-मैत्रीणींचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळणार आहे. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी उद्याचा दिवस फार शुभ असणार आहे. या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होतील. घरात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. मात्र, तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. बाप्पाच्या कृपेने तुमचं आरोग्य देखील पूर्वीपेक्षा चांगलं असणार आहे. संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यात घालवाल. 

Continues below advertisement

धनु रास (Sagittarius Horoscope)

धनु राशीसाठी उद्याचा दिवस भाग्यशाली असणार आहे. या राशीच्या लोकांवर चंद्राचा प्रभाव पाहायला मिळेल. तसेच, या काळात तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न असेल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी उद्याचा दिवस चांगला असणार आहे. या राशीच्या लोकांचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे परत मिळतील. तसेच, कामाच्या ठिकाणी देखील तुम्हाला चांगलं वातावरण मिळेल. सहकाऱ्यांचा पाठिंबा तुमच्याबरोबर असेल. नवीन गोष्टी या काळात शिकाल. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस फार भाग्याचा असणा आहे. या काळात नशिबाची साथ तुमच्याबरोबर असेल. तसेच, नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही फार उत्सुक असाल. जुने वाद मिटतील. या काळात तुम्हाला जर नवीन गोष्ट शिकायची असेल तर तुम्ही शिकू शकता. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :     

Budh Nakshatra Gochar : 29 डिसेंबर तारीख लक्षात ठेवा! बुधाच्या नक्षत्र परिवर्तनाने 'या' 3 राशी होतील मालामाल, नवीन वर्षाची सुरुवातच भन्नाट