Akshay Kumar to Host Iconic Game Show: अॅक्शन हिरो अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी. बऱ्याच काळावधीनंतर अक्षय पुन्हा टेलिव्हिजन (Television) विश्वात पुनरागमन करणार आहे. सोनी टिव्हीवरील 'व्हील ऑफ फॉर्च्यून' नावाच्या शोमधून तो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. निर्मात्यांनी या शोचा प्रोमो रिलीज केला आहे. जवळजवळ 60 देशांमध्ये लोकप्रिय असलेला हा रिअॅलिटी शो आता भारतात देखील सुरू होणार आहे. 'व्हील ऑफ फॉर्च्यून' हा अमेरिकेतील नंबर वन शो असून, या शोने सुमारे 8 एमी पुरस्कार जिंकले आहेत. आता या शोचे इंडियन वर्जन देखील लवकरच सुरू होईल.
'व्हील ऑफ फॉर्च्यून'मध्ये अक्षय कुमार त्याच्या 'तीस मार खान' अवतारामध्ये दिसतोय. या मनोरंजक प्रोमोमध्ये अक्षय नोकराच्या भूमिकेत आहे. यात मालक त्याची करोडो रूपयांची मालमत्ता त्याचा मुलगा राम नसून, नोकर रामूच्या नावे केली असल्यचं दिसून येत आहे. फ्लॅशबॅकमध्ये दाखवले की, मालक मृत्यूपत्र लिहित असतो. त्यावेळेस नोकर रामू चहा घेऊन येतो. मालक मृत्यूपत्रावर राम लिहित असताना, नोकर रामू (अक्षय कुमार) येऊन 'म' अक्षराला उकार देतो. त्यावेळेस रामचं रामू होतं.
नंतर मालकाचे निधन होते. मालकाची सगळी प्रॉपर्टी मुलगा राम नसून, नोकर रामूच्या नावावर होते. प्रोमोच्या शेवटी अक्षय कुमार 'तीस मार खान' च्या भूमिकेत दिसतो. यानंतर अक्षय कुमार म्हणतो, 'त्या एका ऊ अक्षरामुळे सगळं बदललं. शब्द जादूई असू शकतात. आता जादूचे चक्र फिरल्यावर प्रत्येक अक्षर महत्त्वाचे ठरेल. 'व्हील ऑफ फॉर्च्यून' लवकरच सोनी एंटरटेनमेंटवर येत आहे'.
'व्हील ऑफ फॉर्च्यून' हा शो जगातील सर्वात लोकप्रिय गेम शो असल्याचे म्हटले जात आहे. या शोने आतापर्यंत आठ एमी पुरस्कार जिंकले आहेत. हा अमेरिकेतील नंबर वन मनोरंजक शो असून, हा शो 40 देशात हिट आहे. आता लवकरच हा शो भारतात सुरू होणार असून, अक्षय कुमार या शोचे सूत्रसंचालन करणार आहे.
हा गेम शो नेमका कसा असेल?
या शोमध्ये शब्द कोडे आणि लकी व्हील दोन्ही आहेत. स्पर्धक चाक फिरवतात. तसेच अक्षरे निवडून कोडे सोडवण्याचा प्रयत्न करतात. अक्षरे निवडण्याव्यतिरिक्त खेळाडू संपूर्ण कोडे देखील सोडवू शकतो. तसेच त्यानुसार बक्षीस मिळवू शकतो. सोनी टिव्हीने अद्याप इंडियन वर्जनची संपूर्ण माहिती शेअर केलेली नाही. लवकरच या शोबाबत अधिकची माहिती मिळेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा शो 2026च्या सुरुवातीला प्रदर्शित होऊ शकतो. मात्र, निर्मात्यांनी अद्याप तारीख शेअर केलेली नाही.