Budh Nakshatra Gochar 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रह (Mercury) 29 डिसेंबर 2025 रोजी आपल्या स्व-नक्षत्रातून म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रातून केतू नक्षत्रात प्रवेश करणार आहे. क्रूर ग्रह असतानाही ज्योतिष शास्त्रानुसार केतू ग्रहाला मोक्षदायक ग्रह मानतात. अशातच बुध ग्रह 2025 च्या शेवटी केतू नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात काही राशींच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या राशींच्या लोकांच्या करिअर, वैयक्तिक जीवनावर आणि आर्थिक स्थितीवर चांगले परिणाम पाहायला मिळतील. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope)

बुध ग्रहाच्या नक्षत्र बदलाने तुमच्या शिक्षणात चांगली प्रगती झालेली दिसेल. या काळात तुम्ही हाती घेतलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. तुमची अनेक रखडलेली कामे तुम्ही या काळात पूर्ण करु शकता. काही नवीन जबाबदाऱ्या देखील तुमच्यावर सोपवण्यात येतील. परदेशात जाण्याच्या तुम्हाला अनेक संधी निर्माण झालेल्या दिसतील. आध्यात्मात तुमची आवड निर्माण होईल. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

बुध ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने तुमच्या बौद्धिक क्षमतेचा चांगला विकास होईल. या काळात तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, सामाजिक दर्जा तुमचा वाढलेला दिसेल. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. बुध ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा दिसेल. तसेच, उत्पन्नाचे अनेक स्त्रोत तुमच्यासमोर खुले होतील. पैशांची गुंतवणूक करण्यासाठी देखील हा काळ चांगला असणार आहे. 

Continues below advertisement

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये प्रगतीचे अनेक मार्ग मोकळे झालेले दिसतील. तसेच, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. या काळात भावा-बहिणीतील संबंध अधिक दृढ झालेले दिसतील. तसेच, या काळात वृद्धी योगदेखील जुळून येणार आहे. त्यामुळे तुमच्या भौतिक धनसंपत्तीत चांगली भरभराट झालेली दिसेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :                                        

Gajkesari Yog 2026 : महाशक्तिशाली 'गजकेसरी योगा'त होणार नव्या वर्षाची सुरुवात; 'या' 3 राशींचं नवीन वर्ष सुस्साट, नोकरी, गाडी, पैसा होणार डब्बल