Lucky Zodiac Signs On 22 November 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या चालीनुसार प्रत्येक राशींचं आकलन केलं जातं. ज्योतिष शास्त्रात प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह आहे. त्या ग्रहाचा त्या राशीवर जास्त प्रभाव असतो. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, उद्या म्हणजेच 22 नोव्हेंबरचा दिवस काही राशींसाठी शुभ असणार आहे. कारण शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. तसेच, शनीचा देखील दिवस आहे. त्यानुसार, उद्या शनिवारचा दिवस हा शनि देवाला (Shani Dev) समर्पित आहे. अशा वेळी कोणत्या राशींसाठी उद्याचा दिवस लकी असणार आहे ते जाणून घेणार आहोत.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी उद्याचा दिवस भाग्यशाली दिवसांपैकी एक असणार आहे. या कालावधीत तुमची रखडलेली कामे तुम्ही सहज पूर्ण करु शकता. तसेच, जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळू शकते. ग्रहांच्या संक्रमणाचा देखील शुभ परिणाम या राशीवर पडताना दिसणार आहे. त्यामुळे उद्याच्या दिवसात तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी उद्याचा दिवस भाग्यशाली असणार आहे. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. पण हा प्रवास तुमच्यासाठी खडतर नसणार. उलट यातून तुम्हाला आणखी नवीन गोष्टी शिकायला मिळतील. धार्मिक यात्रेला जाण्याची संधी मिळेल. तसेच, तुमची जी महत्त्वाची कामे आहेत ती वेळीच पूर्ण झालेली दिसतील.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी उद्याचा दिवस आत्मविश्वासाचा असणार आहे. उद्याच्या दिवसात तुम्ही घेतलेल्या निर्णयावर तुमचं भविष्य अवलंबून असू शकतं. त्यामुळे जबाबदारीने निर्णय घ्या. ग्रहांची हालचाल तुमच्या बाजूने सकारात्मकच असणार आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी उद्याचा दिवस भाग्यशाली असणार आहे. कामाच्या निमित्ताने तुमचं कौतुक होईल. तसेच, नशिबाची साथ तुम्हाला मिळेल. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला मिळतील. तसेच, तुम्ही हाती घेतलेली कामे वेळीच पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमचे नातेसंबंध अधिक मजबूत होतील. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी लाभदायी ठरेल.
मीन रास (Pisces Horoscope)
उद्याचा दिवस मीन राशीसाठी महत्त्वाचा असणार आहे. तुम्ही ठरवलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. कामाचा जास्त ताण जाणवणार नाही. तसेच, हाती घेतलेलं कार्य पूर्ण करता येईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :