Continues below advertisement

Lucky Zodiac Signs On 20 October 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, उद्याचा दिवस 20 ऑक्टोबरचा आहे. ग्रह-नक्षत्रांच्या चालीनुसार प्रत्येक राशींचं आकलन केलं जातं. ज्योतिष शास्त्रात प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह आहे. त्या ग्रहाचा त्या राशीवर जास्त प्रभाव असतो. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, उद्याचा दिवस काही राशींसाठी शुभ असणार आहे. कारण उद्या दिवाळीच्या (Diwali 2025) पहिल्याच दिवशी अनेक ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे. अशा वेळी कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) उद्याचा दिवस लकी असणार आहे ते जाणून घेणार आहोत.

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी उद्याचा दिवस फार चांगला असणार आहे. तुमच्या प्रेम संबंधांत चांगली सुधारणा झालेली दिसेल. तसेच, दिवाळीचा उत्सव सुरु असल्या कारणाने तुमचा मानसिक तणाव दूर राहील. उद्याच्या दिवसात कुटुंबियांबरोबर तुम्ही छान वेळ घालवू शकाल. संवादातून चांगली गोष्ट घडेल. तसेच, दिवसाच्या शेवटी तुम्हाला शुभवार्ता ऐकायला मिळेल.

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी उद्याचा दिवस फार शुभदायी असणार आहे. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्ही पूर्ण करु शकता. जे लोक सिंगल आहेत त्यांच्यासाठी चांगलं स्थळ येऊ शकतात. तुमच्यातील नातेसंबंध अधिक घट्ट होताना दिसतील. तसेच, ग्रहांची स्थिती पाहता तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी दिवाळीचा पहिला दिवस शुभकारक असणार आहे. या काळात तुमच्या लव्ह लाईफमध्ये चांगली सुधारणा दिसून येईल. तसेच, वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहील. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. तसेच, दिवाळीनिमित्त तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे. या काळात तुमच्या संपत्तीत भरभराट दिसून येईल. मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, तुमच्या कामाचं बॉसकडून चांगलं कौतुक करण्यात येईल. नवीन गोष्टींचा आनंद घ्याल.

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी दिवाळीचा पहिला दिवस लाभदायी असणार आहे. या काळात तुमचे सगळे जुने वादविवाद मिटतील. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, या काळात तुमचं मन धार्मिक कार्यात रमेल. जुन्या मित्र मैत्रीणींशी तुमच्या भेटीगाठी वाढतील. तसेच, दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Numerology : तुम तो धोखेबाज होss, एकापेक्षा जास्त रिलेशनशिपमध्ये असतात 'या' जन्मतारखेचे लोक; वयाच्या कोणत्याही टप्प्यात धोका देऊ शकतात?