Lucky Zodiac Signs On 17 August 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक राशीचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. उद्या 17 ऑगस्ट 2025 चा दिवस आहे. या दिवशी रविवार असल्या कारणाने या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य देतात. तसेच, सूर्यदेवाची पूजा करतात. नवग्रहांमध्ये सूर्य हा सर्वात शक्तिशाली ग्रह मानतात. त्यामुळे उद्याच्या दिवशी कोणत्या राशींवर सूर्यदेवाची कृपा असणार आहे ते जाणून घेऊयात. या राशी (Zodiac Signs) कोणत्या ते पाहूयात.

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी उद्याचा दिवस फार भाग्यशाली असणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वासात वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण करता येतील. व्यवसायाचा चांगला विस्तार झालेला दिसेल. तुम्हाला अचानक धनलाभ होईल. तसेच, तुमच्या रिलेशनशिपमध्ये चांगला बॅलेन्स राहील. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी उद्याचा दिवस फार कास असणार आहे. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. वाहन संपत्तीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, मुलांच्या कलात्मकतेला चांगला वाव मिळेल. करिअरमध्ये प्रगतीचे चांगले मार्ग उपलब्ध होतील. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी उद्याचा दिवस फार चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला समाजात चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. तसेच, कामाच्या ठिकाणी प्रगतीचे अनेक योग जुळून येणार आहेत. पार्टनरबरोबर चांगला व्यवहार राहील. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसठी उद्याचा दिवस फार भाग्यशाली असणार आहे. या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक मार्ग उपलब्ध होतील. तसेच, प्रवासाचे अनेक योग तुमच्यासाठी जुळून येणार आहेत. तसेच, धार्मिक कार्यात तुमचा सहभाग वाढलेला दिसेल. मित्रांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी उद्याचा दिवस फार शुभ असणार आहे. तसेच, देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. मित्रांच्या सहयोगाने तुम्ही अनेक कामे पूर्ण करु शकता. तुमच्या प्रयत्नांना चांगलं यश मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :      

Surya Ketu Yuti 2025 : अवघ्या काही तासांतच 'या' 3 राशींना लागणार ग्रहण; सूर्य केतूच्या युतीमुळे होणार प्रचंड धन हानी, 24 तास राहा अलर्ट