Surya Ketu Yuti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य (Sun) ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतात तेव्हा इतर ग्रहांबरोबर युती बनवतात. याचा प्रभाव सर्व राशींवर पाहायला मिळतो. माहितीसाठी, ग्रहांचा राजा सूर्याने 17 सप्टेंबर रोजी सिंह राशीत प्रवेश केला. या ठिकाणी केतू ग्रह आधीपासू विराजमान आहे. त्यामुळे तब्बल 18 वर्षांनंतर केतू आणि सूर्याची युती पाहायला मिळतेय. केतू आणि सूर्याची ही युती शुभ मानली जात नाही. त्यामुळे या दरम्यान तीन राशींना सावध राहण्याची गरज आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

कुंभ रास (Aquarius Horoscope)

केतू आणि सूर्याची युती कुंभ राशीसाठी फार अनुकूल ठरणार नाही. या काळात तुमच्या नातेसंबंधांत, वैवाहिक जीवनात अनेक अडथळे येतील. तसेच, तुम्हाला सतत ताणतणाव जाणवेल. जर या काळात तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करणार असाल तर करु नका. कुटुंबातील लोकांबरोबर तुमचे मतभेद देखील होऊ शकतात. तसेच, ज्यांना सांधेदुखी आणि हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी या काळात सावध राहणं गरजेचं आहे. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी केतू आणि सूर्याची युती फार घातक ठरणार आहे. या राशीच्या सहाव्या चरणात ही युती होणार आहे. त्यामुळे तुमचे कोर्ट कचेरीच्या संदर्भातील वाद लांबणीवर जाऊ शकतात. तसेच, या काळात वाहन चालवताना काळजी घ्या. ग्रहांची स्थिती शुभ नसल्या कारणाने या काळात कोणतीही जोखीम हाती घेऊ नका. शनीच्या साडेसातीचा परिणाम तुमच्यार देखील होऊ शकतो. त्यामुळे सावधान राहण्याची गरज आहे. 

Continues below advertisement

सिंह रास (Leo Horoscope)

केतू आणि सूर्याच्या युतीचा परिणाम सिंह राशीच्या लोकांवर देखील होऊ शकतो. त्यामुळे या काळात कोणतंही आव्हान हाती घेऊ नका. तुमचा आत्मविश्वास ढासळू शकतो. तसेच, मान-सन्मान देखील कमी होऊ शकतो. त्यामुळे या काळात लांबचा प्रवास करणं टाळा. तसेच, कोणाकडून पैशांची देखील उधारी घेऊ नका. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :                                    

Shani Dev : जन्माष्टमीच्या आधीच 'या' 3 राशींवर प्रसन्न होणार शनि महाराज; त्रिएकादश योगामुळे जगाल राजासारखं आयुष्य, 'ही' वेळ महत्त्वाची