Lucky Zodiac Sign: होळी रे होळी... आज होळीचा दिवस खास आहे. होलिका दहन हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. हा दिवस नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याची आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याची संधी आहे. ज्योतिषींच्या मते, यावर्षी 13 मार्चला होलिका दहनाच्या वेळी 5 राशींचे नशीब चमकणार आहे. या राशींना करिअर, पैसा आणि व्यवसायात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील, आर्थिक स्थिती सुधारेल आणि आनंद निर्माण होईल. जर तुमच्या राशीचा देखील यामध्ये समावेश असेल तर हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 5 भाग्यशाली राशी?
मेष
ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ राहील. नोकरीत असलेल्यांना मोठी बढती मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांनाही मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय प्रलंबित कामे लवकर पूर्ण होऊन आर्थिक स्थिती मजबूत होईल.
वृषभ
ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीच्या लोकांसाठी होलिका दहनाचा दिवस खूप शुभ राहील. तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते परत येण्याची शक्यता आहे. नोकरदारांना नवीन संधी मिळू शकतात आणि त्यांचा पगारही वाढू शकतो. कौटुंबिक जीवन देखील आनंददायी असेल आणि घरात आनंदाचे वातावरण असेल.
सिंह
ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीच्या लोकांना यावेळी व्यवसाय आणि करिअरमध्ये मोठे फायदे मिळण्याची शक्यता आहे. परदेशात जाण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. गुंतवणुकीमुळे चांगला नफाही मिळेल आणि आर्थिक बळ मिळेल. या राशीचे लोक यावेळी नवीन कार किंवा मालमत्ता देखील खरेदी करू शकतात.
धनु
ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीच्या लोकांसाठी हा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप चांगला काळ आहे. ज्यांना शेअर मार्केट किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीत रस आहे, त्यांच्यासाठी हा काळ फायदेशीर राहील. नोकरदारांनाही पदोन्नती आणि पगारात वाढ होण्याची शक्यता आहे.
मकर
ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. नोकरीमध्ये तुम्हाला काही नवीन जबाबदारी मिळू शकते, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा आणि उत्पन्न दोन्ही वाढेल. तुम्हाला कुटुंबाकडूनही सहकार्य मिळेल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
हेही वाचा>>
Shani Transit 2025: वर्ष 2032 पर्यंत 'या' राशीच्या लोकांनी धीर ठेवा! शनिदेव अडचणी, कष्ट देणार? 'असे' उपाय अवश्य करा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )