Lucky Zodiac : ज्योतिषशास्त्रात (Astrology) ग्रह-ताऱ्यांमधील बदलांना विशेष महत्त्व मानले जाते. प्रत्येक ग्रह विशिष्ट वेळी आपली राशी बदलतो. ग्रहांच्या या राशी बदलाला संक्रमण किंवा परिवर्तन म्हणतात. जेव्हा एखादा ग्रह संक्रमण करतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व लोकांच्या जीवनावर होतो. सर्व ग्रहांमध्ये शनि नंतर राहू आणि केतू हे एकमेव ग्रह मानले जातात, जे जीवनात समस्या निर्माण करतात. राहू आणि केतू दोघेही 30 ऑक्टोबरला परिवर्तन करतील. या दोन ग्रहांच्या राशी बदलाने काही लोकांसाठी चांगले दिवस सुरू होतील. जाणून घ्या 30 ऑक्टोबरनंतर कोणत्या राशींना लाभ होणार आहेत? जाणून घ्या


 


मेष
राहूच्या राशी बदलामुळे मेष राशीच्या लोकांसाठी चांगला काळ येईल. राहूच्या संक्रमणाने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील. तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळतील. या राशी बदलामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही प्रत्येक काम यशस्वीपणे करू शकाल. महिना संपताच तुमची प्रलंबित कामेही पूर्ण होऊ लागतील. राहू-केतूच्या या संक्रमणामुळे तुम्हाला खूप सकारात्मक परिणाम मिळतील. तुमची तब्येतही सुधारण्यास सुरुवात होईल.



कर्क
राहू-केतूच्या संक्रमणाने कर्क राशीचे वाईट दिवस संपतील. 30 ऑक्टोबरनंतर तुम्ही प्रगती वेगाने होईल. काही प्रकरणांमध्ये, तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळतील ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. मित्र आणि कुटुंबियांशी तुमचे संबंध दृढ होतील. तुमची आर्थिक स्थितीही सुधारण्यास सुरुवात होईल. कर्क राशीच्या लोकांना पुढील महिन्यात कुठूनतरी चांगली नोकरीची ऑफर मिळू शकते. परदेशातून कमाईच्या नवीन संधी मिळतील. जीवनात आनंद मिळेल.



कन्या
कन्या राशीच्या लोकांना राहू-केतूच्या राशी बदलामुळे शुभ परिणाम मिळतील. तुमचे जीवन आनंद आणि समृद्धीने भरले जाईल. नोकरीत पदोन्नतीचीही संधी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमचा मान-सन्मान वाढेल. अधिकारी तुमच्या कामावर खूप खुश होतील. तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला ऑफिसमध्ये काही नवीन जबाबदारी देखील मिळू शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्पन्न इतर कोणत्यातरी स्रोतातून देखील येऊ शकते. तुम्ही व्यवसायातही मोठी डील फायनल करू शकता. तुम्हाला कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल.



मीन
राहू-केतूच्या राशी बदलामुळे मीन राशीच्या लोकांच्या बाजूने नशीब राहील. तुम्ही मोठी गुंतवणूक करू शकाल. या राशीच्या लोकांना वडिलोपार्जित संपत्तीचाही फायदा होऊ शकतो. राहू-केतूच्या वाईट प्रभावापासून मुक्त होताच तुम्हाला जुन्या कायदेशीर प्रकरणात यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते अधिक घट्ट होईल. घरामध्ये काही शुभ कार्य घडतील. कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखू शकता. या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात चांगले फळ मिळेल.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या


Shani Amavasya 2023: शनिश्चरी अमावस्या 'या' महिन्यात कधी आहे? पितरांसोबतच शनिदेवाची कृपाही होईल! जाणून घ्या