Libra Weekly Horoscope 21 To 27 October 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, ऑक्टोबर महिन्यातला चौथा आठवडा आता सुरु होत आहे. हा नवीन आठवडा तूळ राशीसाठी नेमका कसा असणार आहे? तूळ राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा तूळ राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी तूळ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या. 


तूळ राशीची लव्ह लाईफ (Libra Love Horoscope)


प्रेमाच्या दृष्टीने हा आठवडा चांगला आहे. जोडीदाराला तुम्ही खुश ठेवाल. तुम्हा दोघांनाही एकमेकांची काळजी घ्यावी लागेल आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात एकमेकांना पाठिंबा द्यावा लागेल. काही प्रेमप्रकरणांमध्ये जिथे ब्रेकअप होणार होते, तिथे गोष्टी पुन्हा रुळावर येतील आणि सामान्य होऊ लागतील. ऑफिसमधील लफडी टाळा. या आठवड्यात काही अविवाहित लोक प्रेमात पडतील.


तूळ राशीचे करिअर (Libra Career  Horoscope)


या आठवड्यात तुमच्या व्यावसायिक ध्येयांवर लक्ष केंद्रित करा, तुम्हाला चांगला नफा मिळेल. वकील आणि आरोग्य सेवा करणाऱ्यांचा नवीन आठवडा चांगला राहील. मीटिंगमध्ये नवीन कल्पना घेऊन या आणि त्या दृष्टीने काम करत राहा, तुम्हाला फायदा होईल. कार्यालयीन राजकारण आणि गप्पांपासून सावध राहा, ज्यामुळे तुमच्या कामाच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. मॅनेजरच्या गुड बुक्समध्ये राहण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येक वादापासून दूर राहा. ज्यांना नोकरी बदलायची आहे ते दुसरीकडे अर्ज करू शकतात, तुम्हाला लवकरच मुलाखतीसाठी कॉल येऊ शकतो.


तूळ राशीची आर्थिक स्थिती (Libra Wealth Horoscope)


आर्थिकदृष्ट्या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी चांगली नाही. गुंतवणूक किंवा कोणताही नवीन व्यवसाय करणं टाळा. या काळात कोणताही नवीन व्यवसाय सुरू करू नका. तूळ राशीच्या लोकांनी या आठवड्यात दानधर्मासाठी पैसे द्यावेत. कुटुंबातील भावा-बहिणींसोबत संपत्तीचे वाद संपतील. या आठवड्यात आर्थिक समस्या जाणवतील, परंतु त्यांचा दैनंदिन जीवनावर परिणाम होणार नाही.


तूळ राशीचे आरोग्य  (Libra Health Horoscope)


तूळ राशीच्या लोकांना एक चांगली आहार योजना बनवावी लागेल, ज्यामध्ये तुम्ही हिरव्या भाज्या आणि फळं खाऊ शकता. काही महिलांना श्वसनाचा त्रास होईल. खेळाडूंना किरकोळ समस्या होऊ शकतात. सांधेदुखीबाबत काळजी घ्या. या आठवड्यात भरपूर पाणी प्या आणि अल्कोहोल कायमचं टाळा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Weekly Horoscope 21 To 27 October 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या