Leo Weekly Horoscope 20 To 26 January 2025 : राशीभविष्यानुसार, सिंह राशीसाठी नवीन आठवडा आर्थिकदृष्ट्या चांगला असेल. तुमची लव्ह लाईफ देखील या आठवड्यात चांगली असेल. या आठवड्यात तुमचे उत्पन्न स्रोत वाढतील. एकूणच सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? सिंह राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
सिंह राशीची लव्ह लाईफ (Libra Love Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा महत्त्वाचा असणार आहे. या आठवड्यात तुमच्याप्रती काळजी दिसून येईल. तसेच, काहींच्या नात्यात अनेक चढ-उतार दिसतील. याचं कारण म्हणजे तुमचा वाढता अहंकार. यामुळे तुमच्या नात्यात अनेक गैरसमज निर्माण होऊन नातं दुरावू शकतं. यासाठी तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या लवकरात लवकर दूर करण्याचा प्रयत्न करा.
सिंह राशीचे करिअर (Libra Career Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुमच्या पार्टनरचं मन जपण्याचा प्रयत्न करा. तसेच, भावना व्यक्त करताना सतर्क राहा. कारण, तुमचा पार्टनर गैरसमज करुन घेऊ शकतो. तसेच, जे सिंगल लोक आहेत त्यांची खास व्यक्तीशी भेटीगाठी होतील. यातून विषय कदाचित पुढे जाऊ शकतो. या आठवड्यात आई-वडिलांचं म्हणणं ऐकायचं.
सिंह राशीची आर्थिक स्थिती (Leo Wealth Horoscope)
सिंह राशीच्या लोकांनी नवीन आठवड्यात आपल्या जॉबवर फोकस करणं गरजेचं आहे. तसेच, ऑफिसमधील पॉलिटिक्सपासून शक्य तेवढे दूर राहण्याचा प्रयत्न करा. तसेच, कामाच्या ठिकाणी दिलेलं प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. या कालावधीत तुमचे सिनिअर्सबरोबर वादविवाद देखील होऊ शकतात. तुमच्या व्यवसायात आत्मविश्वासाने तुम्ही नवीन प्रोजेक्टवर काम सुरु करु शकता.
सिंह राशीचे आरोग्य (Leo Health Horoscope)
सिंह राशीच्या आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुम्ही तुमच्या दिनश्चर्येत फिजिकल एक्टिव्हिटीचा समावेश करा. यामध्ये तुम्ही योग, ध्यान, तसेच, चालणे यांचा सहभाग करुन घेऊ शकता. तसेच, तुम्ही तुमच्या आहारावर नियंत्रण देण्याची गरज आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: