Laxmi Narayan Rajyog : अवघ्या काही दिवसांत बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे मिथुन राशीत लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे. 14 जूनला मिथुन राशीत लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. 29 जूनपर्यंत हा योग मिथुन राशीत राहील. बुध आणि शुक्राच्या युतीमुळे तयार झालेला हा योग 5 राशींसाठी विशेष फलदायी मानला जातो. या काळात या राशींवर देवी लक्ष्मी आणि भगवान शंकराचा आशीर्वाद राहील, त्यांना आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगती होईल. या 5 भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मिथुन रास (Gemini)


मिथुन राशीत शुक्र आणि बुध यांचा संयोग होणार आहे. अशा परिस्थितीत लक्ष्मी नारायण राजयोग तुमच्या जीवनात अपार धन, संपत्ती आणि आनंद घेऊन येणार आहे. या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. एवढंच नाही तर, या काळात तुम्हाला व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील आणि नोकरदार लोकांना पदोन्नती मिळेल. प्रेमसंबंधात बराच काळ तणाव सुरू होता, तोही आता संपणार आहे. एकूणच, या काळात तुम्हाला सर्व कामात अपेक्षित परिणाम मिळणार आहेत.


कन्या रास (Virgo)


कन्या राशीच्या लोकांच्या कर्म घरात लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. या काळात तुम्हाला सरकारी कामाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. हा काळ कन्या राशीच्या लोकांसाठी अनुकूल असू शकतो. या काळात तुमचं सोशल सर्कलही वाढेल. समाजात तुमची वेगळी प्रतिमा निर्माण होईल. याशिवाय सरकारी योजनांतूनही तुम्हाला लाभ मिळू शकतो. फक्त झोकून देऊन आणि मेहनतीने तुमचं काम करत राहा. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल.


तूळ रास (Libra)


लक्ष्मी नारायण राजयोग तूळ राशीच्या लोकांसाठी प्रभावी ठरेल. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून लाभ मिळू शकतो. मात्र, या काळात तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. तुम्हाला अध्यात्मात अधिक रस असेल. त्याचबरोबर धार्मिक कार्यात गुंतलेल्यांसाठी हा काळ सुवर्णकाळ ठरू शकतो.


धनु रास (Sagittarius)


धनु राशीच्या सातव्या घरात लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. अशा स्थितीत तुमचं वैवाहिक जीवन पूर्वीपेक्षा मजबूत होईल. या काळात व्यावसायिकांना मोठा नफा मिळू शकतो. तुमच्या काही कायदेशीर बाबी बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होत्या, त्या आता पूर्ण होतील. तुम्हाला कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल. या राशीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणात काही मोठे लाभही मिळू शकतात. एवढंच नाही तर या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा मिळेल. नात्यात आलेली सर्व दूरी आता दूर होईल.


कुंभ रास (Aquarius)


कुंभ राशीच्या पाचव्या घरात लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या मुलाकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. याशिवाय तुमची मानसिक स्थितीही पूर्वीपेक्षा चांगली राहील. तुमची विचारशक्ती मजबूत असेल आणि या काळात तुम्ही घेतलेले निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. आर्थिक बाबतीत हा काळ तुमच्यासाठी खूप फायदेशीर असेल. या काळात तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळतील. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा खूप चांगली होणार आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Shani : शनि उडवणार 'या' 3 राशींची झोप; जुलैपासून कठीण काळ होणार सुरू, 'हे' उपाय सर्व संकटांतून वाचवतील