Lakshmi Narayan Yog 2025 : ज्योतिष शास्त्रात, बुध (Mercury) आणि शुक्र (Venus) ग्रह हे ग्रह महत्त्वाचे मानले जातात. शुक्र ग्रह सुख, शांती, ऐश्वर्य, प्रेम आणि सौंदर्याचा कारक ग्रह मानतात. तर, बुध ग्रह हा बुद्धी, तर्क, वाणी आणि व्यवसायाचा कारक ग्रह मानला जातो. या दोन्ही ग्रहांचं संक्रमण फार महत्त्वाचं मानलं जातं. या दोन्ही ग्रहांचा प्रभाव फार विस्ताराने पडतो.
सध्या बुध ग्रह वृश्चिक राशीत विराजमान आहे. पंचांगानुसार, बुध ग्रह 23 नोव्हेंबर रोजी तूळ राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी शुक्र ग्रह संक्रमण करणार आहे. अशातच 23 नोव्हेंबर रोजी तूळ राशीत बुध आणि शुक्र ग्रहांची युती होणार आहे. या दोन्ही ग्रहांची युती झाल्याने लक्ष्मी नारायण योग निर्माण होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 23 नोव्हेंबर रोजी जुळून येणारा लक्ष्मी नारायण योग तीन राशींसाठी धनलाभ देणारा ठरु शकतो.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ ही शुक्र ग्रहाची रास आहे. त्यामुळे लक्ष्मी नारायण योग तूळ राशीसाठी फार शुभकारक ठरु शकतो. या काळात तुमच्या जीवनात अनेक आनंददायी गोष्टी घडू शकतात. तुम्हाला तुमच्या कर्माचं चांगलं फळ मिळेल. तसेच, समाजात मान-सन्मान वाढेल. भौतिक सुख सुविधांमध्ये तुमचा खर्च वाढू शकतो.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी लक्ष्मी नारायण योग फार फलदायी ठरणार आहे. या काळात तुमच्यासाठी प्रगतीचे अनेक नवीन मार्ग उपलब्ध होतील. उत्पन्नाचे नवीन मार्ग तुमच्यासाठी उपलब्ध होतील. परदेशात जाण्याची संधी तुम्हाला मिळेल. तसेच, तुम्हाला मुलांच्या संदर्भात शुभवार्ता ऐकायला मिळू शकते.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग फार लाभदायक ठरु शकतो. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत भरभराट पाहायला मिळेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. तसेच, जोडीदाराची तुम्हाला चांगली साथ लाभेल. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :