Janmashtami 2024 Date : जन्माष्टमीचा पवित्र सण श्रीकृष्णाच्या जन्मदिनी (Janmashtami 2024) साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, द्वापर युगात श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्यामुळे या दिवशी जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी लोक उपवास करतात आणि रात्री बाळ श्रीकृष्णाच्या जन्मानंतर विधीवत पूजा करतात. हा सण मथुरा आणि वृंदावनसह जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदा जन्माष्टमी कधी आहे? शुभ मुहर्त, पूजा विधी आणि महत्त्व जाणून घेऊया

Continues below advertisement

जन्माष्टमी 2024 कधी आहे? (Janmashtami 2024 Date)

यंदा 26 ऑगस्टला जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. यावर्षी श्रावण कृष्ण अष्टमी तिथी 26 ऑगस्ट रोजी पहाटे 3 वाजून 39 मिनिटांनी सुरू होत आहे. 27 ऑगस्टला पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी अष्टमी तिथी संपेल. 

जन्माष्टमी 2024 शुभ मुहूर्त (Janmashtami 2024 Puja Muhurta)

कृष्ण जन्माष्टमी पूजेची वेळ मध्यरात्री 12 ते 12.45 पर्यंत असेल. यंदा बाळगोपाळची पूजा करण्यासाठी 45 मिनिटांचा वेळ मिळणार आहे. तुम्हाला 27 ऑगस्टला सकाळी 11 वाजता उपवास सोडता येईल.

Continues below advertisement

जन्माष्टमी 2024 पूजा मंत्र (Janmashtami 2024 Puja Mantra)

जन्माष्टमीला श्रीकृष्णाची पूजा करण्यासाठी तुम्ही दोन मंत्र वापरू शकता.

1. ओम नमो भगवते वासुदेवाय ।

2. ओम कृष्णाय वासुदेवाय गोविंदाय नमो नमः।

सर्वार्थ सिद्धी योगात साजरी होणार जन्माष्टमी (Janmashtami 2024 Shubh Yog)

या वर्षी जन्माष्टमीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग जुळून आला आहे. जन्माष्टमी दिवशी सर्वार्थ सिद्धी योग दुपारी 3:55 पासून सुरू होईल आणि 27 ऑगस्टला पहाटे 5:57 पर्यंत चालेल. अशा स्थितीत सर्वार्थ सिद्धी योगात श्रीकृष्णाचा जन्मदिवस साजरा होणार आहे.

जन्माष्टमीचे महत्त्व (Janmashtami 2024 Significance)

या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून जन्माष्टमीचं महत्त्व अधिक आहे. अपत्यहीन जोडप्यांसाठी जन्माष्टमीचा सण खूप महत्त्वाचा आहे. जे निपुत्रिक आहेत त्यांनी जन्माष्टमीचं व्रत ठेवावं आणि बाळगोपाळांची पूजा करावी, असं सांगितलं जातं. त्याच्या कृपेने त्या व्यक्तीला मूल होऊ शकतं. या दिवशी जी व्यक्ती उपवास आणि विधीपूर्वक पूजा करते तिच्या आयुष्यातील सर्व संकटं दूर होतात, तसेच जीवनात सुख-समृद्धी नांदते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Vastu Shastra : घरात मांजरीने पिल्लं देणं शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...