Janmashatmi 2024 : जीवन म्हटलं की त्यात चढ-उतार आलेच, कधी दु:खाचा डोंगर, तर कधी सुखाची सावली.. हार-जीतच्या या युगात आज यश मिळवणे, तसेच त्यात टिकून राहणेही तितकेच कठीण आहे, आज कृष्णजन्माष्टमी... धार्मिक मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णाचा जन्म आजच्या दिवशी झाला, श्रीकृष्णाने शिकवलेले शब्द हे अर्जुनसाठी जितके महत्ताचे होते, तितकेच ते या युगातील तरुणांसाठीही महत्त्वाचे आहेत. आजच्या स्पर्धात्मक युगात श्रीकृष्णा व्यावहारिक ज्ञानाचे सार जीवनात यशाची हमी कशी देते ते जाणून घ्या.


 


खरा मित्र तोच....


भगवान श्रीकृष्णाने पांडवांना प्रत्येक कठीण प्रसंगी साथ देऊन हे सिद्ध केले होते की, फक्त तेच मित्र चांगले असतात जे तुम्हाला अत्यंत कठीण प्रसंगात साथ देतात. मैत्रीत अटींना जागा नसते, त्यामुळे असे मित्रही तुमच्या अवतीभोवती ठेवावे जे प्रत्येक कठीण प्रसंगात तुमचा आधार असतील.


 


क्रांतिकारी विचारांनी समृद्ध...


भगवान श्रीकृष्ण प्रत्येक आघाडीवर क्रांतिकारी विचारांनी समृद्ध आहे. त्यांचे सर्वात मोठे आकर्षण हे आहे की, ते कोणत्याही ठरवलेल्या मार्गाचा अवलंब करत नाही. प्रसंगी गरजेनुसार त्यांनी आपली भूमिका बदलली आणि अर्जुनाचे सारथी झाले.


 


स्वतःच्या चुका आणि अपयशातून शिका


महाभारताचा महान योद्धा अर्जुन केवळ त्याच्या गुरूंकडून शिकला नाही, तर त्याच्या अनुभवातून तो नेहमी काहीतरी शिकत राहिला. हे शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचे आहे. शिक्षकाव्यतिरिक्त विद्यार्थ्याने नेहमी स्वतःच्या चुका आणि अपयशातून शिकले पाहिजे. असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात.


 


उत्तम रणनीती


जर पांडवांकडे भगवान श्रीकृष्णाची उत्तम रणनीती नसती, तर ते युद्ध जिंकू शकले नसते. त्यामुळे कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी रणनीती बनवणे आवश्यक आहे.


 


दूरदृष्टी असावी


जर तुम्ही कृष्णाशी संबंधित कोणतीही कथा वाचली तर तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की, एखादी व्यक्ती दूरदृष्टी असावी आणि परिस्थितीचे आकलन कसे करावे हे त्याला माहित असले पाहिजे.


 


धैर्य गमावू नका


कृष्ण आपल्याला हे देखील शिकवतात की, आपण संकटाच्या वेळी किंवा यश मिळत नाही म्हणून धैर्य गमावू नये. त्याऐवजी पराभवाची कारणे जाणून घेऊन पुढे जायला हवे. समस्यांना सामोरे जा. एकदा तुम्ही भीतीवर मात केली की विजय तुमच्या पायाशी असेल.


 


व्यवस्थापनाचे सर्वात मोठे गुरू


भगवान श्रीकृष्ण हे व्यवस्थापनाचे सर्वात मोठे गुरू आहेत, त्यांनी शिस्तीत जगण्याचा, विनाकारण चिंता न करण्याचा आणि भविष्याऐवजी वर्तमानावर लक्ष केंद्रित करण्याचा मंत्र दिला.


 


मैत्री करायला शिका


जेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपल्या मित्र सुदामाची गरिबी पाहिली, तेव्हा त्यांनी आपल्या घरी पोहोचण्यापूर्वीच त्याच्या झोपडीच्या जागी एक महाल बांधला. म्हणूनच असे म्हटले जाते की एखाद्याने कृष्णाशी मैत्री करायला शिकले पाहिजे आणि नातेसंबंधांमध्ये अशी स्थिती कधीही येऊ नये.


 


मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारा


प्रत्यक्ष मार्गाने सर्व काही साध्य करणे सोपे नाही. विशेषतः जेव्हा तुमच्या विरोधकांचा वरचष्मा असतो. अशा परिस्थितीत मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारावा.


 


हेही वाचा>>>


Janmashtami Baby Photos Ideas : कृष्णजन्माष्टमीला आपल्या बालगोपाळांना सजवा, गोंडस श्रीकृष्ण बनवा! बेबी फोटोशूटच्या भारी आयडिया


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )