Ketu Gochar 2026 : वैदिक शास्त्रानुसार, केतू (Ketu Gochar) ग्रहाला विशेष महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. राहूच्या संक्रमणाचा आपल्या जीवनावर फार खोलवर परिणाम होतो. त्याचप्रमाणे नवीन वर्षात इतर ग्रहांप्रमाणे राहू-केतूचं सुद्धा संक्रमण होणार आहे. त्यामुळे याचा सर्व राशींवर परिणाम दिसून येईल.  तसेच, राहूचा छाया ग्रह केतू आपल्या रहस्यमयी आणि गहन ऊर्जेसाठी वेगवेगळ्या राशींवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रभाव टाकतो. 

Continues below advertisement

नवीन वर्षात 29 मार्च 2026 रोजी केतू ग्रह मघा नक्षत्रात संक्रमण करणार आहे. त्यानंतर, 25 नोव्हेंबर रोजी अश्लेषा नक्षत्रात प्रवेश करेल. त्यानंतर 5 डिसेंबर 2026 रोजी केतू ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर, राहू ग्रहसुद्धा या कालावधीत आपल्या चालीत बदल करेल. 2 ऑगस्ट 2026 रोजी राहू कुंभ राशीच्या धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. 5 डिसेंबर 2026 रोजी मकर राशींत संक्रमण करणार आहे. अशा प्रकारे राहू-केतू ग्रहाचं संक्रमण चार राशींवर भारी पडणार आहे. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

नवीन वर्ष 2026 वृषभ राशीसाठी कौटुंबिक आणि सामाजिकदृष्ट्या फार आव्हानात्मक जाणार आहे. या काळात तुमच्यातील मतभेद वाढण्याची शक्यता आहे. तसेच, पैसे गुंतवणूक करण्याची जोखीम या काळात हाती घेऊ नका. नवीन व्यवहार करताना तो प्रामाणिकपणे करा. तुमच्या लव्ह लाईफमध्ये पार्टनरबरोबर गैरसमज निर्माण होऊ शकतात. तसेच, अहंकार येऊ शकतो. जे लोक अविवाहित आहेत त्यांच्यासाठी हा का अनुकूल नाही. त्यामुळे या कालखंडात कोणतीच जोखीम हातात घेऊ नका. 

Continues below advertisement

सिंह रास (Leo Horoscope)

नवीन वर्षात सिंह राशीच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत तुमच्या व्यवसायात आणि गुंतवणुकीत तुमचं अचानक नुकसान होण्याची आहे. त्यामुळे जे निर्णय तुम्ही एकट्याने घ्याल त्यात तुम्हाला अपयशाचा सामना कराव लागेल. तसेच तुमच्या खर्चावर तुम्ही नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तुम्हाला मानसिक थकवा जाणवे. नकारात्मक विचार तुमच्या डोक्यात येतील. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष 2026 संघर्षाचं जाणार आहे. या काळात तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येणार नाहीत. तसेच, पैशांची गुंतवणूक या काळात तुम्ही करु नका. व्यवसायात देखील तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे. तसेच, या काळात तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. 

हे ही वाचा :                                  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Weekly Horoscope : सरत्या वर्षात कोणत्या राशींना लॉटरी लागणार? डिसेंबरचा तिसरा आठवडा कोणासाठी खास? वाचा सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य