Karva Chauth 2024 : हिंदू धर्मग्रंथाप्रमाणे, सुवासिनी करवा चौथचा (Karva Chauth) उपवास करतात. या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. याशिवाय कुमारिका मुलीही चांगला वर मिळावा यासाठी व्रत ठेवतात. त्यानुसार, येत्या 20 ऑक्टोबरला करवा चौथचा महिला उपवास करणार आहेत. या दिवशी दान करण्याची देखील पद्धत आहे. त्यानुसार, तुमच्या राशीनुसार कोणत्या वस्तू दान कराव्यात या संदर्भात आपण जाणून घेऊयात. 


मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीचे लोक करवा चौथच्या दिवशी गूळ किंवा तांब्याची वस्तू दान करु शकता. असं म्हणतात की, यामुळे तुमच्या साहस आणि ऊर्जेत चांगली वाढ होते. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


वृषभ राशीचे लोक करवा चौथच्या दिवशी पांढरे कपडे आणि तांदूळ दान करु शकतात. यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत स्थिरता येईल. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांनी या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे किंवा मूग दान करु शकतात. यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. 


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीच्या लोकांनी चांदी आणि दूध दान करावं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा वावर होतो. 


सिंह रास (Leo Horoscope)


सिंह राशीच्या लोकांनी या दिवशी गव्हाचं दान करु शकतात. यामुळे समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. 


कन्या रास (Virgo Horoscope)


कन्या राशीच्या लोकांनी करवा चौथच्या दिवशी हिरवी फळं आणि दान करणं शुभ आहे. यामुळे दांपत्य जीवनातील सर्व समस्या दूर होतील. 


तूळ रास (Libra Horoscope)


तूळ राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी श्रृंगारिक वस्तूंचं दान करणं शुभ मानलं जातं. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope)


वृश्चिक राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी लाल वस्त्र आणि तांब्याचं भांडं दान करु शकता. यामुळे तुमच्या साहस आणि आत्मविश्वासात चांगली वाढ होईल. 


धनु रास (Sagittarius Horoscope)


धनु राशीच्या लोकांनी या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे दान करु शकता. यामुळे तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुम्हाला यश मिळेल. 


मकर रास (Capricorn Horoscope)


तुमच्या करिअरमध्ये यश मिळावं म्हणून लोखंड किंवा तिळाचं दान करु शकता. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)


तुम्हाला आयुष्यात सुख-शांती हवी असेल तर कुंभ राशीच्या लोकांनी या दिवशी पाणी आणि निळ्या रंगाचे कपडे दान करु शकता. 


मीन रास (Pisces Horoscope)


मीन राशीचे लोक करवा चौथच्या दिवशी पिवळ्या रंगाचं फूल आणि बेसन पिठाचं दान करु शकता. यामुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतात. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Diwali 2024 Date : 29 की 30 ऑक्टोबर यंदा दिवाळी नेमकी कधी? धनत्रयोदशी ते भाऊबीजेपर्यंत जाणून घ्या अचूक तारीख