Jyotish Upay : अनेकदा लोक घराबाहेर किंवा दुकानात लिंबू-मिरची टांगतात. विशेषत: कोणत्याही नवीन गोष्टीच्या सुरुवातीला लिंबावर पाच किंवा सात मिरच्या लावणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की, यामुळे घर किंवा व्यवसायाला कोणाची वाईट नजर लागत नाही. तंत्र-मंत्र आणि इतर विधींमध्ये याचा विशेष वापर केला जातो. जरी बरेच लोक याला अंधश्रद्धा मानतात. लिंबू-मिरचीचे हे उपाय ज्योतिषशास्त्रात खूप शक्तिशाली मानले जातात. असे म्हटले जाते की, लिंबाचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा माणसाचे वाईट नजरेपासून संरक्षण करतो.


 


दुकानात लिंबू-मिरची का टांगतात?


वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी लिंबाचा वापर केला जातो. लिंबू चवीला खूप आंबट असते तर मिरची तिखट असते. दोघांचा हा गुण व्यक्तीची एकाग्रता आणि लक्ष भंग करण्यासाठी प्रभावी मानला जातो. असे मानले जाते की, जर एखाद्या व्यक्तीने व्यक्तीच्या घरी किंवा दुकानात वाईट नजर टाकली किंवा त्याच्याकडे पाहिले तर त्याची त्या वस्तूवर वाईट नजर जाते. लिंबू-मिरची लटकवल्याने पाहणाऱ्याचे लक्ष त्यांच्याकडे राहते आणि त्याची एकाग्रता बिघडते. यामुळेच बहुतेक लोक आपल्या घरी किंवा दुकानात लिंबू-मिरची टांगतात. तर दुसरीकडे वास्तूनुसार लिंबू आणि मिरचीमध्ये कीटकनाशक गुणधर्म असून ते दारात लावल्याने वातावरण शुद्ध राहते. हे नकारात्मक ऊर्जा रोखण्याचे काम करते.


लिंबू आणि मिरचीचे वैज्ञानिक कारण


असं म्हणतात की, जेव्हा कोणी मिरची, लिंबू यांसारख्या गोष्टी पाहतो. तेव्हा त्याच्या मनात त्याची चव जाणवू लागते. त्यामुळे त्याला मिरची-लिंबू जास्त वेळ दिसत नाहीत आणि लगेच तिथून लक्ष वळवते. दारावर लिंबू-मिरची टांगण्यामागे शास्त्रीय कारणही आहे. लिंबाचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा यामुळे उग्र वास येतो आणि तो दारावर लावल्याने माश्या आणि डास घरात येत नाहीत असे म्हणतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्वाच्या बातम्या


Name Astrology: 'O' अक्षराच्या नावाचे लोक असतात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित, सहजासहजी हार मानत नाहीत


Astrology : आयुष्यात प्रगती आणि आनंद हवा असेल, तर रविवारी करा हे 6 सोपे उपाय