Jupiter Transit 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, गुरु ग्रह बृहस्पतीला समृद्धी, ज्ञान, वैभव आणि मान-सन्मानाचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे जेव्हा गुरु ग्रहाच्या चालीत परिवर्तन होतं तेव्हा काही राशींवर खास प्रभाव पडतो. माहितीनुसार, 10 एप्रिल रोजी गुरु ग्रह मंगळ ग्रहाच्या नक्षत्र मृगशिरामध्ये संक्रमण करणार आहे. यामुळे गुरु ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने सर्व राशींवर याचा परिणाम होणार आहे. यामधल्या लकी राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 


मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली शुभवार्ता देखील मिळू शकते. अनेक क्षेत्रात लाभ मिळण्याचे संकेत दिसून येतायत. या काळात तुमच्या आरोग्यात देखील चांगली सुधारणा झालेली दिसून येईल. तुमचा आत्मविश्वास चांगला वाढलेला असेल. या काळात तुमच्या धनसंपत्तीत वाढ झालेली दिसेल. 


धनु रास (Sagittarius Horoscope)


धनु राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रह बृहस्पतीच्या नक्षत्र परिवर्तनाने सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. यामुळे तुमचं नशीब चांगलं उजळू शकतं. तसेच, या काळात तुम्ही परदेशात कामानिमित्त जाऊ शकता. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना आपल्या कामात चांगलं यश मिळेल. तसेच, या काळात तुम्ही वाहन किंवा प्रॉपर्टी देखील खरेदी करु शकता. तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. तुमची अनेक रखडलेली कामे तुम्ही पूर्ण करु शकता. 


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ फार अनुकूल  असणार आहे. तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. तुमची चांगली गुंतवणूक होईल. तसेच, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. नवीन काम सुरु करण्यासाठी हा काळा तुमच्यासाठी शुभ असणार आहे. प्रवासाचे योग जुळून येणार आहेत. तसेच, शनीचं राशी परिवर्तन 29 मार्च रोजी झालं आहे. त्यामुळे शनीच्या ढैय्यापासून तुम्हाला चांगली मुक्ती मिळेल. तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:                                 


Shani Dev : लवकरच होतंय शनीचं नक्षत्र परिवर्तन; 28 एप्रिलपासून 'या' 2 राशी ठरतील भाग्यवान, धनसंपत्तीचा होणार वर्षाव