June Month Numerology Horoscope : ज्योतिषशास्त्राप्रमाणेच, अंकशास्त्रातूनही (Ank Shastra) व्यक्तीच्या भविष्य, स्वभाव आणि व्यक्तीत्वाची ओळख पटते. यासाठी मूलांकाची (Moolank) मदत घेतली जाते. हा मूलांक व्यक्तीच्या जन्मतारखेशी (Birth Date) जोडला जातो. जसे की, ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3,12,21 किंवा 30 तारखेला झाला आहे तर अशा लोकांचा मूलांक 3 असेल. त्यानुसार तुमच्या जन्मतारीख किंवा मूलांकावरून जून महिना तुमच्यासाठी नेमका कसा असणार आहे ते जाणून घेऊयात.
मूलांक 3
ज्या लोकांची जन्मतारीख 3, 12, 21 किंवा 30 आहे अशा लोकांचा मूलांक 3 असतो. या जन्मतारखेच्या लोकांना जून महिन्यात अनेक लाभाच्या संधी मिळू शकतात. तसेच, या कालावधीत तुम्हाला अनेक शुभवार्ता देखील मिळतील. तुमच्या यशात वाढ होईल, आत्मविश्वास वाढेल. तसेच, तुमचं तुमच्या ध्येयावर पूर्ण लक्ष असेल. तुमच्या कामाचं इतरांकडून कौतुक होईल. तुमच्या प्रोफेशनल लाईफबरोबरच तुमचं वैयक्तिक आयुष्यही फार आनंदात जाईल. या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबियांबरोबर धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता.
मूलांक 5
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला झाला आहे अशा लोकांचा मूलांक 5 आहे. या जन्मतारखेच्या लोकांना जून महिन्यात अप्रत्यक्षपणे धनलाभ होऊ शकतो. देवी लक्ष्मीची तुमच्यावर चांगली कृपा असणार आहे. तुम्हाला संतान प्राप्तीदेखील होऊ शकते. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल.
मूलांक 7
कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 या तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 आहे. या जन्मतारखेच्या लोकांना जून महिन्यात करिअरमध्ये अनेक नवीन संधी मिळतील. तुमच्या नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या उत्पन्नातही वाढ होईल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तुमचं कौटुंबिक जीवन आनंददायी असेल. या काळात तुम्ही नवीन वाहन खरेदी देखील करू शकता.
मूलांक 9
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला झाला आहे अशा लोकांचा मूलांक 9 असतो. या लोकांना जून महिन्यात कामात यश मिळेल. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. तसेच, या काळात तुम्हाला काही महत्त्वाच्या कामासाठी परदेशी जाण्याची संधीदेखील मिळू शकते. तुमच्या कार्यक्षेत्रात सकारात्मक बदल घडताना दिसतील. तुमची बदली तुम्हाला हव्या असलेल्या ठिकाणी होऊ शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: