January 2025 Festivals List: नवीन वर्षाचं मोठ्या जल्लोषात आगमन झालंय. यंदा 2025 हे नवीन वर्ष खूप खास असणार आहे. याचं कारण म्हणजे तब्बल 12 वर्षांनंतर 2025 वर्षात महाकुंभ होत आहे. पौष महिन्याच्या पौर्णिमा तिथीपासून माघ महिन्याच्या अमावस्या तिथीपर्यंत प्रत्येक दिवस यंदा खास असणार आहे. जानेवारी महिन्यात प्रजासत्ताक दिन, मकर संक्रांती, एकादशी, प्रदोष व्रत अशा अनेक तारखा येतील. जर तुम्हाला जानेवारी 2025 च्या व्रत सणाचे संपूर्ण कॅलेंडर आधीच माहित करून घ्यायचे असेल, तर तुम्ही त्या सण, उपवासांची सर्व तयारी करू शकाल.
जानेवारी व्रत सणांची यादी 2025
- 06 जानेवारी - गुरु गोविंद सिंह जयंती
- 10 जानेवारी - तैलंग स्वामी जयंती / पुत्रदा एकादशी
- 11 जानेवारी - शनिप्रदोष व्रत (शुक्ल)
- 12 जानेवारी - स्वामी विवेकानंद जयंती, राजमाता जिजामाता भोसले जयंती (तारखेनुसार), राष्ट्रीय युवा दिन
- 13 जानेवारी - भोगी/पौष पौर्णिमा व्रत महाकुंभ सुरू होत आहे, राजमाता जिजामाता भोसले जयंती (तिथीनुसार)
- 14 जानेवारी - मकर संक्रांती, पोंगल आणि उत्तरायण
- 15 जानेवारी - संक्रात करिदिन
- 16 जानेवारी- धर्मवीर छ. संभाजी महाराज राज्याभिषेक दिन
- 17 जानेवारी - संकष्टी चतुर्थी
- 23 जानेवारी - हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती, नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती
- 25 जानेवारी - षटतिला एकादशी, संत निवृत्तीनाथ यात्रा (त्र्यंबकेश्वर)
- 26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन
- 27 जानेवारी - सोम प्रदोष व्रत (कृष्ण), मासिक शिवरात्री
- 28 जानेवारी- लाला लजपतराय जयंती
- 29 जानेवारी - माघ अमावस्या
प्रयागराजमध्ये महाकुंभाला सुरूवात
याशिवाय, 13 जानेवारी 2025 रोजी प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू होणार आहे. हा मेळा 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे. महाकुंभ दरम्यान संगमात स्नान करणार असाल तर त्याची पूर्वतयारी करा. वर्षाच्या पहिल्या पौर्णिमेच्या दिवशी सुरू होणाऱ्या या जत्रेला धार्मिक महत्त्व तर आहेच पण जगभरातून लोकही ती पाहण्यासाठी येतात. यावेळी 40-45 कोटी लोक प्रयागराजला पोहोचतील अशी अपेक्षा आहे.
शाही स्नानासाठी तीन मोठ्या तारखा
जानेवारी महिन्यात महाकुंभात शाही स्नानासाठी तीन मोठ्या तारखा आहेत. पौष पौर्णिमेच्या स्नानापासून ते मकर संक्रांती आणि मौनी अमावस्येपर्यंतच्या स्नानाला विशेष मानले जाते. या दिवसात येथे गर्दी जास्त असेल.
हेही वाचा>>
Hindu Religion: काय सांगता! 2025 वर्ष पूर्ण होऊन आधीच 57 वर्षे झालीयत? आताचं वर्ष हे 2082 आहे? हिंदू धर्मात काय म्हटलंय?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)