Janmashtami 2022 : कृष्ण जन्माष्टमी व्रताला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपदाच्या कृष्ण पक्षातील रोहिणी नक्षत्रात अष्टमी तिथीला झाला होता. या दिवशी भक्त कृष्णाची जयंती साजरी करतात आणि उपवास ठेवत भगवान श्रीकृष्णाची पूजा करतात. या दिवशी श्रीकृष्णाची पूजा केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते.


यावेळी जन्माष्टमी दोन दिवस साजरी केली जाणार आहे, या दिवशी अनेक विशेष योग आणि मुहूर्त तयार होत आहेत, जे पूजेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत.


ज्योतिष शास्त्रानुसार ज्यांच्या कुंडलीत चंद्र कमजोर आहे, त्यांच्यासाठी श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत वरदानापेक्षा कमी नाही. ज्या जोडप्यांना अपत्य होत नाही त्यांच्यासाठी हे व्रत खूप शुभ राहील. या राशीच्या लोकांना जन्माष्टमी व्रताचे विशेष लाभ होणार आहेत.


कर्क : कर्क राशीचा ग्रह चंद्र आहे. जन्माष्टमी व्रताने चंद्र बलवान होतो. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने रखडलेली कामे पूर्ण होतील. सर्व कामात यश मिळेल. पैसे असतील.


वृश्चिक : या राशीच्या लोकांना धनप्राप्तीचे योग आहेत. नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होईल. उमेदवारांना परीक्षेत चांगला निकाल मिळेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्वाच्या बातम्या :