Horoscope Today, September 27, 2022 : आज हस्त नक्षत्र असून, चंद्र कन्या राशीत असेल. संध्याकाळनंतर चंद्र तूळ राशीत प्रवेश करेल. गुरु मीन राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना मानसन्मान मिळेल. वृषभ राशीच्या लोकांनी आज कोणत्याही वादात पडू नये. वाचा संपूर्ण राशीभविष्य...
मेष (Aries Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आज व्यवसायात फायदा होईल. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. भरपूर आत्मविश्वास मिळेल. स्वावलंबी व्हा. शैक्षणिक कार्यात मान-सन्मान मिळेल. व्यवसायात सुधारणा होईल, पण जास्त मेहनत करावी लागेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. प्रयत्नांना यश मिळेल. कौटुंबिक स्थिती आनंददायी राहील.
वृषभ (Taurus Horoscope) : आज तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. कोणालाही न विचारता सल्ला देणे टाळावे लागेल. कार्यक्षेत्रात फायद्याची संधी असेल, तर ती हातातून जाऊ देऊ नका. परीक्षेसाठी विद्यार्थी त्यांच्या वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊ शकतात. मालमत्तेशी संबंधित एखाद्या वादात तुम्हाला तुमच्या वडिलांचा सल्ला घ्यावा लागेल. आज कोणाकडून ऐकलेल्या गोष्टींवर वाद घालू नका.
मिथुन (Gemini Horoscope) : आजचा दिवस काहीसा कठीण असणार आहे. आयुष्यात अनेक चढ-उतार येतील. अनावश्यक भांडणे आणि वादांपासून दूर राहा. नोकरीत अधिकाऱ्यांशी सामंजस्य ठेवा. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आर्थिकस्थिती सुधारेल. शैक्षणिक किंवा बौद्धिक कार्यात व्यस्तता वाढू शकते. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
कर्क (Cancer Horoscope) : भाग्य आज महत्वाची भूमिका बजावेल. जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु होईल. योजनांशी संबंधित प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर आणि भांडवल मिळाल्यानंतर, आपण व्यवसाय सुरु करण्याच्या दिशेने पुढे जाल. प्रत्येक पावलावर योग्य लोक आणि उत्तम संधी मिळत राहतील, ज्या यश मिळवून देतील.
सिंह (Leo Horoscope) : आजचा दिवस चांगला जाईल. गोड बोलून कोणतेही काम सहजपणे यशस्वी करू शकाल. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाने वेळ घालवाल. विचार न करता कोणताही निर्णय घेऊ नका. प्रियजनांकडून तुम्हाला फायदा होईल. मित्र आणि नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. विरोधकांचा सामना करू शकाल. व्यवसाय आणि नोकरीत लाभ होईल. लोक तुमच्या प्रतिभेची प्रशंसा करतील.
कन्या (Virgo Horoscope) : कन्या राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. खूप धमाल करण्याची संधी मिळेल. तणावपूर्ण कामे टाळा. ऑफिसमध्ये चांगले काम करा. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळू शकते. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. कामाच्या व्यापातही वाढ होऊ शकते. खर्च वाढतील. कामाचा भार वाढेल. अनावश्यक गोष्टींवर पैसा खर्च करणे टाळा.
तूळ (Libra Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. आपण आपले काम चांगल्याप्रकारे करावे जेणेकरून उच्च अधिकार्यांना तक्रार करण्याची संधी मिळणार नाही. बराच काळ व्यवसाय करत आहात आणि तो चांगला चालला आहे, पण आता त्या व्यवसायाला नवी दिशा देण्याची वेळ आली आहे. आपल्या प्रियजनांना मदत करण्यात मागे हटू नका. सहकार्य करा, यामुळे कौटुंबिक कार्यात एकरूपता येईल.
वृश्चिक (Scorpio Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फलदायी असणार आहे. तुमचे मन आनंदी असेल कारण पैसे मिळवण्याच्या अनेक संधी मिळतील. परंतु, तुम्ही तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी काही पैसे खर्च कराल. वरिष्ठ सदस्य आज तुम्हाला एखाद्या कायदेशीर प्रकरणावर काही सल्ला देऊ शकतात, त्यामुळे त्यांचा सल्ला घेणे तुमच्यासाठी चांगले राहील. काही इतर समस्या असतील तर, आज तुमची त्यातूनही सुटका होईल.
धनु (Sagittarius Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. नकारात्मक विचार टाळा. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. मान-सन्मान मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत उच्च पद मिळेल. दुसऱ्या ठिकाणी जावे लागेल. आरोग्याची काळजी घ्या. संयम कमी होऊ शकतो. आरोग्याच्या समस्या असू शकतात. शैक्षणिक कामात अडचणी येऊ शकतात. मित्राशी वैचारिक मतभेद होऊ शकतात.
मकर (Capricorn Horoscope) : आजचा दिवस पूर्णपणे शुभ आहे. आयात-निर्यातीचे काम करणाऱ्या लोकांना फायदा होईल. मित्र किंवा नातेवाईकाकडून मिळालेल्या आनंदाच्या बातमीने तुमचे मन प्रसन्न राहील. धार्मिक प्रवासाची शक्यता आहे. आज तुमची कोणतीही जुनी कामाची योजना पूर्ण होईल. अपूर्ण काम पूर्ण झाल्यामुळे आनंदी व्हाल. व्यवसायात लाभ होईल. प्रेम जीवनात समाधान मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने तुमचा काळ चांगला आहे.
कुंभ (Aquarius Horoscope) : नोकरीत एखाद्या मोठ्या कंपनीत सेवा करण्याची संधी मिळू शकते. भावनांवर नियंत्रण ठेवा. बौद्धिक कामातून धनप्राप्ती होईल. नोकरीत कामाचा ताण वाढू शकतो. स्वभावात चिडचिडेपणा असू शकतो. आत्मविश्वास वाढेल. एखादा महत्त्वाचा प्रश्न सुटेल. मुलांमुळे कौटुंबिक वातावरणात तणाव निर्माण होऊ शकतो. मन आणि वाणीवर नियंत्रण ठेवा.
मीन (Pisces Horoscope) : आजचा दिवस फायद्याचा असणार आहे. आज तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. व्यवसायाशी संबंधित काही समस्या असल्यास अनुभवी व्यक्तीच्या मदतीने त्या सोडवता येतील. चांगल्या कामांसाठी अधिकारी तुमची प्रशंसा करतील, त्यामुळे तुम्हाला कार्यक्षेत्रात बढतीही मिळू शकते. कोणत्याही नव्या कामाची तयारी करत असाल, तर त्यासाठी खूप मेहनत करावी लागेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या