Horoscope Today, September 18, 2022 : आज मृगशीर्ष नक्षत्र असून, चंद्र मिथुन राशीत आहे. शनि आज मकर राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. सूर्याने आता कन्या राशीत प्रवेश केला आहे. मंगळ वृषभ राशीत आहे. मेष राशीचा लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांची महत्त्वाची कामे पूर्ण होणार आहेत. वाचा संपूर्ण राशीभविष्य...


मेष (Aries Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. खूप पैसा खर्च करू शकता, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात चांगले फायदेही मिळतील. काही घरगुती समस्यांपासून मुक्त व्हाल. कुटुंबातील वरिष्ठ सदस्य तुम्हाला यामध्ये मदत करतील. अध्यात्माची आवड वाढल्याने तुम्ही धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभागी व्हाल.


वृषभ (Taurus Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेले महत्त्वाचे काम पूर्ण होईल. कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेचा निकाल तुमच्या बाजूने येईल. जवळच्या मित्राची भेट होईल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. व्यवसायात मोठ्या कंपनीसोबत डील फायनल होईल, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल.


मिथुन (Gemini Horoscope) : आज तुमची एखादी इच्छा पूर्ण न झाल्यामुळे तुम्ही निराश होऊ शकता. जवळचा माणूस तुम्हाला कठीण काळात मदत करेल. गरज असताना कुटुंबातील सदस्यांकडून मदत मिळणार नाही. बहुप्रतिक्षित काम पूर्ण झाल्याने आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. आर्थिक बाजू मजबूत राहील. पैसा जपून खर्च करा.


कर्क (Cancer Horoscope) : अतिराग टाळा. व्यवसायात लक्ष द्या. कामाचा व्याप वाढेल. मात्र, आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. भरपूर आत्मविश्वास निर्माण होईल. बोलण्यात संयम ठेवण्याचा प्रयत्न करा. खर्च वाढू शकतो. जोडीदाराच्या आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. मित्रांचे सहकार्य मिळेल. मन अस्वस्थ होईल. धार्मिक कार्यक्रमात भाग घेता येईल.


सिंह (Leo Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी असणार आहे. कोर्टाशी संबंधित प्रकरणामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. शत्रू तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील, ते टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या चतुर बुद्धिमत्तेचा वापर करावा लागेल. शेअर बाजार किंवा मालमत्ता इत्यादींमध्ये गुंतवणूक करतात, त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. बोलण्यातील सौम्यपणा तुम्हाला आदर मिळेल.


कन्या (Virgo Horoscope) : आजचा दिवस त्म्च्यसाठी उत्साहाचा असणार आहे. यश मिळवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न कराल. तुम्ही काही गोष्टींनी स्वतःला दुखावत आहात आणि तुम्हाला भावना लपवायच्या आहेत. त्यामुळे निर्णय घेताना हृदयाची साद ऐका. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. ऑफिसमध्ये अधिकाऱ्याचे सहकार्य मिळेल. व्यवसायात प्रतिष्ठा वाढेल.


तूळ (Libra Horoscope) : आज मन अस्वस्थ होऊ शकते. बोलण्यात संयम ठेवा. व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. व्यर्थ धावपळ होईल. खर्चही वाढेल. मित्रांचे सहकार्य मिळू शकते. आत्मविश्वास भरपूर असेल. आरोग्याची काळजी घ्या. राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. लाभाच्या संधी मिळतील.


वृश्चिक (Scorpio Horoscope) : आज तुम्हाला तंदुरुस्त वाटेल. नवीन स्त्रोतांकडून अचानक धनलाभ होईल. आज प्रगती निश्चित होईल. जवळच्या लोकांसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. नोकरीत काही कामासाठी तुमची प्रशंसा होईल, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित लोकांना चांगल्या ऑफर्स मिळतील. प्रिय व्यक्तीची भेट होईल. अडकलेले पैसे परत मिळतील.


धनु (Sagittarius Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्याच्या दृष्टीकोनातून चांगला जाणार आहे. तुम्ही काही नवीन काम सुरू केले, तर तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जीवनसाथीसोबतच्या भांडणामुळे तुमचे मन अस्वस्थ होईल. दिनक्रमात काही बदल करू शकता. काही चांगले काम उद्यासाठी पुढे ढकलू शकता. कामाच्या ठिकाणीही सकारात्मक दृष्टीकोन अंगीकारावा लागेल.


मकर (Capricorn Horoscope) : आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी कौतुक ऐकायला मिळेल. प्रवासाचा बेत बनेल. आपले लक्ष विचलित करणे टाळावे. कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण झाल्यासारखे वाटणार नाही. काही मित्रांसोबत मतभेदाची परिस्थिती देखील उद्भवू शकते, आपण त्यापासून दूर राहावे. कौटुंबिक वातावरण आनंदमय राहील. घरात चांगला वेळ घालवता येईल.


कुंभ (Aquarius Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये काही समस्या आणू शकतो. आज काही समस्या तुमची डोकेदुखी बनतील. काही पैसे उधार घ्यावे लागतील. मनातील अस्वस्थतेमुळे आणि रागामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणासही चुकीचे शब्द बोलू शकता. कोणत्याही गुंतवणुकीचा काळजीपूर्वक विचार करावा लागेल, अन्यथा तुम्हाला नंतर त्याचे नुकसान सहन करावे लागेल.


मीन (Pisces Horoscope) : आज आत्मविश्वास वाढेल, पण अतिउत्साही होणे टाळा. मित्राच्या मदतीने व्यवसायाच्या संधी मिळू शकतात. उत्पन्न वाढेल. राग आणि समाधान दोन्हींची अनुभूती येईल. नोकरीत बदल होऊ शकतो. कौटुंबिक आनंदात बाधा येऊ शकते. कुटुंबातील सदस्याला आरोग्याच्या समस्या असू शकतात. मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव पडू शकतो.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्वाच्या बातम्या