Horoscope Today, August 13, 2022 : आज शततारका नक्षत्र आहे. चंद्र कुंभ राशीत आहे. शनि आज मकर राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे आणि सूर्य कर्क राशीत आहे. मेष राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभामुळे मानसिक आनंद होईल. वृषभ राशीच्या लोकांना नोकरी किंवा व्यवसायात फायदा होईल. वाचा संपूर्ण राशीभविष्य...


मेष (Aries Horoscope) : अचानक आर्थिक लाभामुळे मानसिक आनंद होईल. दूर राहणाऱ्या मुलांकडून चांगली बातमी मिळेल. दूरच्या प्रवासाची योजना आखू शकता. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायातही नफ्याची अपेक्षा करू शकता. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. पालकांचे सहकार्य मिळेल. व्यावसायिक दृष्टिकोनातून आजचा दिवस लाभदायक आहे. आर्थिक जीवन आणि वैयक्तिक जीवन यात समतोल असू द्या.


वृषभ (Taurus Horoscope) : आज तुमच्या विचारातील प्रत्येक काम पूर्ण होईल. ऑफिसमधील सहकाऱ्यांची मदत मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला उत्साही वाटेल. जोडीदारासोबत प्रवासाची योजना आखू शकता. नोकरी किंवा व्यवसायात फायदा होईल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुमच्या बाजूने असणारे सर्व निर्णय लाभदायक ठरतील. नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाची कामे सहज पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.


मिथुन (Gemini Horoscope) : आजच्या दिवसाची सुरुवात एखाद्या चांगल्या बातमीने होईल. व्यावसायासाठी केलेला प्रवास फायदेशीर ठरेल. आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. तुमचे मन प्रसन्न राहील. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या बोलण्याने सर्वांची मने जिंकाल. कामाच्या ठिकाणी सर्व कामे पूर्ण होतील, आर्थिक स्थिती मजबूत राहील.


कर्क (Cancer Horoscope) : आर्थिक स्थिती मजबूत राहील. कार्यक्षेत्रात एखादी मोठी डील फायनल होऊ शकते. व्यवसायात प्रगती होईल. समाजात मान-सन्मान वाढेल, खेळाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. करिअरमध्ये नवी भरभराट होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. कुटुंबात एखादा कार्यक्रम आयोजित करू शकता. खाण्यापिण्याची काळजी घ्या, अन्यथा तब्येत बिघडू शकते.


सिंह (Leo Horoscope) : पती-पत्नीमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. आरोग्याची विशेष काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायातही रस वाटणार नाही. तुमच्या कामाचे श्रेय दुसऱ्याला मिळू शकते. भागीदारांसोबत वागण्यातही मतभेद होऊ शकतात. जुनी अडकलेली कामे मार्गी लागतील. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरीच्या ठिकाणी मित्रांच्या मदतीने कोणतेही मोठे काम पूर्ण होऊ शकते. लाभाची शक्यता आहे.


कन्या (Virgo Horoscope) : अनावश्यक धावपळ सुरु राहील. व्यवसायात स्थान बदलल्याने व्यस्तता वाढू शकते. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या पगारात वाढ होऊ शकते. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या सहलीला जाऊ शकता. कामाच्या ठिकाणी नवीन आव्हाने येतील, वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागू शकते. रागावर नियंत्रण ठेवा, विनाकारण वादात पडू नका.


तूळ (Libra Horoscope) : आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस त्रासदायक असू शकतो, परंतु कौटुंबिक जीवनात तुम्हाला विशेष यश मिळेल. आर्थिक जीवन सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी कामात काही अडथळे येऊ शकतात. ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. सहकाऱ्यांकडून मदतीची अपेक्षा करू नका. दीर्घ काळापासून प्रलंबित न्यायालयीन खटले तुमच्या बाजूने लागतील.


वृश्चिक (Scorpio Horoscope) : मानसिक थकवा जाणवेल. कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांशी मतभेद होऊ शकतात. जोडीदाराशी किंवा प्रिय व्यक्तीशीही वाद होऊ शकतात. आज तुम्हाला जमीन, मालमत्ता किंवा वाहन खरेदी किंवा कागदपत्रांच्या कामात काळजी घ्यावी लागेल. निष्काळजीपणामुळे नुकसान होईल. घाईघाईने केलेली गुंतवणूक भविष्यात चिंतेत टाकू शकते. नोकरी व्यवसायाशी संबंधित लोकांच्या पगारात वाढ होऊ शकते.


धनु (Sagittarius Horoscope) : तुम्ही भावनिकदृष्ट्या अस्वस्थ राहू शकता. आर्थिक स्थिती अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतात. मात्र, विनाकारण वादात पडू नका, रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या संदर्भात प्रवास होऊ शकतो, ज्यामुळे थकवा येईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही, योग्य वेळेची वाट पहा. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे, तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.


मकर (Capricorn Horoscope) : वैवाहिक जीवन आनंदी राहील. पालकांचे सहकार्य मिळेल. निरर्थक धावपळ होईल. आरोग्याची काळजी घ्या. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्या. नोकरी किंवा व्यवसायात प्रगती करण्यासाठी संयमाने काम करावे लागेल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी तुम्ही नवीन योजना आखू शकता.


कुंभ (Aquarius Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आनंददायी असेल. नातेवाईक, मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसह घरात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक दृष्टिकोनातून दिवस लाभदायक आहे. व्यवसायात जास्त मेहनत करून अधिक नफा मिळवू शकाल. खर्च वाढल्याने आर्थिक परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी बदल होऊ शकतो. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात.


मीन (Pisces Horoscope) : आज मानसिक अस्वस्थता अधिक राहील. मन एकाग्र राहू शकणार नाही. यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी मन लागणार नाही. अधिकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा वादात अडकू शकता. मित्रांच्या मदतीने व्यवसायात फायदा होईल. खर्च वाढल्याने तुम्ही आर्थिकदृष्ट्या अडचणीत येऊ शकता. भांडवली गुंतवणुकीत विशेष काळजी घ्यावी लागेल. नातेवाईकांशी वाद घालू नका.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्वाच्या बातम्या :


Ashwattha Maruti Poojan 2022 : श्रावणातील शनिवार म्हणजे अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस; काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या


Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ