Horoscope Today 9 May 2024 : पंचांगानुसार, आज 9 मे 2024, आजचा दिवस गुरुवार. आजचा दिवस काही राशींसाठी लाभदायक तर काही राशींसाठी तोट्याचा असणार आहे. आजच्या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा गुरुवारचा दिवस कसा राहील? आज तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


मी म्हणेन ती पूर्व दिशा हे तुमच्या विचार आणि कृतीतून तुम्ही दाखवून द्याल. नोकरी धंद्यात वरिष्ठांच्या अनाकलनीय वागण्यामुळे गोंधळून जाल.


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


योग्य नियोजन आणि कामाची तत्परता यामुळे सर्वांची मर्जी सांभाळण्यात यश मिळेल. महिलांनी तब्येतीकडे लक्ष द्यावे. 


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


तरुणांना प्रिय व्यक्तींचा सहवास मिळेल. घरातील मोठ्या व्यक्तींच्या शिस्तीमुळे थोडी चिडचिड पण होणार आहे. 


कर्क रास (Cancer Horoscope Today)


काही गोष्टींसाठी प्रचंड कष्ट करावे लागतील त्यानंतरच कामे पूर्ण होतील. घरातील लहान मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. 


सिंह रास (Leo Horoscope Today)


भरपूर काम कराल. परंतु, आरामाच्या वेळी आराम करणे आवश्यक राहील. नैसर्गिक समतोल आहार घेण्यावर भर द्या. 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


व्यायामत नियमितपणा ठेवा त्याचा आरोग्यासाठी उपयोग होणार आहे. ज्यांना व्यसने आहेत त्यांनी बंधन पाळणे आवश्यक ठरेल.


तूळ रास (Libra Horoscope Today)


आत्मविश्वासाला अहंकाराचा लेप दिला तर व्यवहारात तोटा होण्याची शक्यता जास्त. महिला जरा जास्तच रसिक बनतील. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


कोणतीही समस्या सोडवण्यासाठी समस्यांचा प्राधान्यक्रम ठरवा. भावनांवर नियंत्रण ठेवून तर्कशुद्ध विचार करावा लागेल. 


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


सकारात्मक दृष्टीने काम केल्यास कामे मार्गी लागतील. आर्थिक स्थिती सुधारेल. 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


तरुणांचा अनावश्यक गोष्टीत बराच वेळ वाया जाईल. सर्वांशी मिळून मिसळून वागाल. महिला आपले छंद जोपासतील.


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


आज तुमच्या विरुद्ध बोलण्याचे धाडस कोणाचे होणार नाही. त्यामुळे आपल्या मनाप्रमाणे कामे मार्गी लावण्यासाठी वेळेचा उपयोग तुम्हाला करून घेता येईल.


मीन रास (Pisces Horoscope Today)


नोकरीमध्ये जे काम करायला मिळावे असा प्रयत्न करत होतात ते काम करण्याची संधी मिळेल. व्यवसायात एकापेक्षा अनेक कामे मिळतील.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117