Horoscope Today 8 May 2024 : पंचांगानुसार, आज 8 मे 2024, बुधवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष (Aries Horoscope Today)


मुलांच्या विचारांची बरोबरी तुम्ही करू न शकल्यामुळे मत भिन्नता निर्माण होऊन मनावर ताण उत्पन्न होईल. 


वृषभ (Taurus Horoscope Today)


वैवाहिक जीवनात संघर्ष आणि अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. तरुण वर्गालाही प्रेम प्रकरणांमध्ये अडथळे येऊ शकतात.


मिथुन (Gemini Horoscope Today)


इतरांचा अंदाज घेताना त्यांच्या वरच्या स्वभावावर जाऊ नका. लेखन कलाक्षेत्रामध्ये बुद्धीची चमक दाखवू शकाल. 


कर्क (Cancer Horoscope Today)


कलाकारांना आपल्या कलेचा आविष्कार दाखवण्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांनी इतर गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा अभ्यासात लक्ष द्यावे.     


सिंह (Leo Horoscope Today)


आपले ध्येय ओळखून त्या दृष्टीने प्रयत्न कराल. मोठ्या भावंडांच्या विचित्र वागणुकीचा त्रास होईल.


कन्या (Virgo Horoscope Today)


व्यापारी वर्गाला काही गोष्टींचे आकलन न झाल्यामुळे निर्णय घेणे कठीण जाईल. महिलांना आपले स्वत्व जपण्याची संधी मिळेल.


तूळ (Libra Horoscope Today)


नोकरीमध्ये वरिष्ठांच्या अरेरावीला तोंड द्यावे लागेल, परंतु घरातील वातावरण हलकेफुलके राहिल्यामुळे स्वास्थ्य लाभेल. 


वृश्चिक (Scorpio Horoscope Today)


मनाविरुद्ध असलेली एकही गोष्ट करणार नाही. तशी परिस्थिती व्यवस्थित हाताळण्यात यशस्वी होणार आहात. 


धनु (Sagittarius Horoscope Today)


नोकरी-व्यवसायामध्ये वरिष्ठांशी वाद न घालता काम साधून घेणे चांगले जमेल. रक्तदाब हृदयविकाराच्या पेशंटने पथ्य पाणी आहार विहार सांभाळावा.


मकर (Capricorn Horoscope Today)


आज मनाचा तोल सांभाळावा. नातेवाईकांना हात उसने पैसे दिले असतील तर त्याची मागणी करावी.


कुंभ (Aquarius Horoscope Today)


पैशाची वसुली करताना उच्चपदस्थ लोकांची मध्यस्थी घ्यायला हरकत नाही. तरुणांना स्वतःसाठी काही उत्पन्नाची बाब असावी याचा साक्षात्कार होईल. 


मीन (Pisces Horoscope Today)


काही वेळेस शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते याचा प्रत्यय येईल. नवीन नवीन गोष्टी करण्याची इच्छा निर्माण होईल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117


हेही वाचा:


Shani Dev : 12 मेपासून 'या' राशींना येणार सोन्याचे दिवस; शनि नक्षत्र बदलणार, घरात पैशांची आवक वाढणार