Horoscope Today 7 December 2025 : वैदिक पंचांगानुसार, आज 7 डिसेंबर 2025, आजचा वार रविवार आहे. आज मार्गशीर्ष महिन्याची संकष्ट चतुर्थी आहे. तसेच, 2025 वर्षातील ही शेवटची संकष्ट चतुर्थी असल्याने आजचा दिवस फार खास असणार आहे. आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. बुधादित्य योग आणि लक्ष्मी नारायण राजयोगदेखील निर्माण झाला आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. गणरायाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope Today)

परदेश गमनाचे योग येतील फक्त त्यासाठी काही तांत्रिक अडचणींचा सामना मात्र करावा लागेल.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा प्रत्या घ्याल व्यवसाय धंद्यातील कामाला वेग येईल.

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीकडून मदतीचे आश्वासन मिळेल पैशाची मुबलकता नसली तरी गरजेपुरते पैसे हातात पडतील.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

महिलांच्या आचार विचारांना चांगले वळण मिळेल लोकांना संघटित करण्याबाबत विशेष रुची ठेवाल.

सिंह रास (Leo Horoscope Today)

राजकारणी लोकांना आपल्या कामांमध्ये अडथळे आले तरी चिकाटी ठेवून काम पुढे नेण्याची जबाबदारी ठेवावी लागेल.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

लेखकांना आपल्या वाङ्मयाचा व्यासंग वाढवता येईल प्रेमी जना ना प्रेम प्रकरणात अडथळे संभवतात.

तूळ रास (Libra Horoscope Today)

कोणत्याही निर्णयात अथवा बोलण्यात ठामपणे आढळत नसल्यामुळे कामाची गती मंदावेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

आज थोडा  निष्काळजीपणा वाढेल नको तेथे पैसा खर्च करण्याची प्रवृत्ती राहील.

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

व्यवसाय नोकरीत बढाया मारून चालणार नाही थोड्या एककली स्वभावामुळे विसरभोळेपणा वाढेल.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

कोणाला जामीन राहू नये एरवी व्यवहारी समजले जाणारे तुम्ही परंतु त्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

महिलांची धार्मिक अध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल संयमित रहाल.

मीन रास (Pisces Horoscope Today)

आज स्वभाव शांत राहील विवाह लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :                        

Sankashti Chaturthi : 2025 वर्षातील शेवटची मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी नेमकी कधी? नोट करा पूजा, विधी, तारीख, शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ