Sankashti Chaturthi 2025 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, संकष्ट चतुर्थीला (Sankashti Chaturthi) फार महत्त्व आहे. हा दिवस लाडक्या गणरायाला समर्पित आहे. त्यानुसार, 2025 वर्षातील शेवटची चतुर्थी उद्या म्हणजेच 7 डिसेंबर 2025 रोजी आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखतात. गणेशाची पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात तसेच, घरात सुख-समृद्धी नांदते. 

Continues below advertisement

हिंदू पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी नेमकी कधी याबाबत अनेकांचा संभ्रम आहे. यासाठीच संकष्ट चतुर्थीची तारीख, चंद्रोदयाची वेळ आणि या दिवशी काय करावं तसेच, काय करु नये हे जाणून घेऊयात. 

संकष्ट चतुर्थी तिथी आणि शुभ मुहूर्त (Sankashti Chaturthi Shubh Muhurta 2025)

हिंदू पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्याची संकष्ट चतुर्थी रविवारी म्हणजेच 7 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, सोमवारी 8 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 04 वाजून 03 मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे. अशातच उदयतिथीनुसार, 7 डिसेंबर रोजी संकष्ट चतुर्थीचं व्रत असणार आहे. 

Continues below advertisement

संकष्ट चतुर्थी पूजा विधी (Sankashti Chaturthi Puja Vidhi 2024)

  • संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करा आणि सूर्याला जल अर्पण करा. 
  • त्यानंतर, घरातील पूजेच्या ठिकाणी गणेशाचा फोटो लावा. 
  • विधीनुसार, गणेशाला जल अर्पण करा. 
  • त्यानंतर, गणपतीच्या फोटोला पिवळ्या फुलांची माळ घाला. आणि कुंकू लावा. 
  • तसेच, या दिवशी घरात घरात बनवलेले गोडाधोडाचे पदार्थ जसे की, मिठाई, मोदक असा प्रसाद चढवा. 
  • देवाच्या फोटोसमोर दुर्वा ठेवा. 
  • देवाची मनोभावे आरती करा. 
  • पूजा झाल्यानंतर भक्तांमध्ये हा प्रसाद वाटा. 

चंद्रोदयाची वेळ 

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळेलाही फार महत्त्व आहे. त्यानुसार मुंबईत रात्री 8 वाजून 34 मिनिटांनी, ठाण्यात 8 वाजून 33 मिनिटांनी, पुण्यात 8 वाजून 31 मिनिटांनी, रत्नागिरी 8 वाजून 37 मिनिटांनी, कोल्हापूर 8 वाजून 34 मिनिटांनी तर नाशिक 8 वाजून 28 मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :                                                                 

Budhaditya and Lakshmi Narayan Rajyog 2025 : अवघ्या काही तासांनी बुधाचा डबल धमाका! 2 शुभ राजयोगांनी वर्षाच्या शेवटी 'या' राशींना मिळणार संधी, नवीन वर्ष जोमात