Numerology 2026 : 2025 संपायला अवघे काही दिवस उरले आहेत आणि नव्या वर्षाबाबत लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे ते म्हणजेआपलं वर्ष कसं जाणार?अंकशास्त्रानुसार (Ank Shastra) 2026 हे मूलांक 1चं वर्ष आहे. म्हणजेच नेतृत्व, निर्णय आणि नवीन सुरुवातीचं वर्ष असणार आहे. पण प्रत्येक जन्मतारखेवर याचा परिणाम वेगवेगळा होणार आहे. कोणाला मोठी संधी, तर कोणाला सावध राहण्याचा इशारा या काळात देण्यात येणार आहे. त्यानुसार मूलांक 1 ते 9 चं नवीन वर्ष कसं असेल ते जाणून घेऊयात.
मूलांक 1
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 1 असतो. या जन्मतारखेच्या लोकांसाठी नवीन वर्ष हे पॉवर आणि जबाबदारी घेऊन येणारं वर्ष आहे. हे लोक आधीच नेतृत्वगुण घेऊन जन्मलेले असतात आणि 2026 मध्ये ते अधिक ठळक होतील.
सल्ला :अहंकार कमी ठेवा, टीमवर्क वाढवा.
मूलांक 2
ज्या जन्मतारखेच्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 2 असतो. तुमच्यासाठी हे वर्ष भावनिक उलथापालथीचं वर्ष असणार आहे.
2026 मध्ये मूलांक 2 असलेले लोक अधिक संवेदनशील होतील. नातेसंबंध, प्रेम, कुटुंब याला प्राधान्य द्याल.
सल्ला : स्वतःच्या भावनाही तितक्याच महत्त्वाच्या समजा.
मूलांक 3
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 3 असतो. या जन्मतारखेच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष यशाचं वर्ष असणार आहे. पण आळस तुमच्यासाठी घातक ठरेल. मूलांक 3 असलेल्यांसाठी 2026 मध्ये ज्ञान, प्रसिद्धी आणि ओळख वाढेल. मीडिया, शिक्षण, क्रिएटिव्ह क्षेत्रात मोठ्या संधी मिळू शकतात.
सल्ला : वेळेचं नियोजन शिका.
मूलांक 4
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13 , 22 आणि 31 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 4 असतो. तुमच्यासाठी हे वर्ष संघर्षाचं नाही तर स्थैर्याचं वर्ष आहे. गेल्या काही वर्षांचा संघर्ष 2026 मध्ये हळूहळू कमी होईल. शिस्त आणि सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळेल.
सल्ला : संयम ठेवा, परिणाम नक्की मिळेल.
मूलांक 5
ज्या जन्मतारखेच्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 5 असतो. तुमच्यासाठी नवीन वर्ष वेगाने बदलणारंअणार आहे. या काळात तुम्हाला बदलाचा स्वीकार करावा लागेल. तसेच, अनेक नवीन संधी आयुष्यात तुम्हाला मिळतील. प्रवासाचे योग जुळून येतील.
सल्ला : विचारपूर्वक निर्णय घ्या.
मूलांक 6
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 6 असतो. तुमच्यासाठी नवीन वर्ष हे प्रेमात सुख, समाधान आणि जबाबदारी घेऊन येणारं वर्ष आहे. या दरम्यान तुम्ही तुमच्या कुटुंबियांना आधी प्राधान्य द्याल. तसेच, जर तुम्हाला नवीन घर, वाहन किंवा एखादी प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी हे वर्ष लाभदायी ठरणार आहे.
सल्ला :बजेट सांभाळा.
मूलांक 7
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 7 असतो. या जन्मतारखेच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष आत्मचिंतनाचं वर्ष आहे. या कालावधीत तुम्ही अधिक अंतर्मुख व्हाल. आध्यात्मिक, आणि संशोधनात्मक गोष्टींमध्ये तुमचा कल वाढेल.
सल्ला : लोकांशी संवाद ठेवा.
मूलांक 8
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 8 असतो. 8 हा अंक शनिदेवाचा आहे. त्यामुळे कर्मफळाचं हे वर्ष असणार आहे. या काळात जरी तुम्हाला उशीर झाला तरी तुम्हाला न्याय मिळेल हे लक्षात ठेवा. शनीच्या प्रभावामुळे मूलांक 8 असलेल्यांसाठी 2026 हा काळ सर्वात कठीण पण निर्णायक असणार आहे. मेहनत केली तर वर्षाच्या उत्तरार्धात मोठा दिलासा मिळेल.
सल्ला : प्रामाणिकपणा सोडू नका.
मूलांक 9
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला झाला आहे. अशा लोकांचा मूलांक 9 असतो. तुमच्यासाठी नवीन वर्ष शक्ती आणि धैर्याचं हे वर्ष असणार आहे. देवावर तुमचा जास्त विश्वास असेल. तसेच, या काळात तुम्ही काही धाडसी निर्णय घ्याल. सेवा, नेतृत्व आणि संघर्षातून तुम्हाला यश मिळेल.
सल्ला : संयम आणि सेवा हेच यशाचं गुपित.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
