Horoscope Today 30 December 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 30 डिसेंबर (December) 2025 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार मंगळवार आहे. आजचा दिवस भगवान हनुमानाला समर्पित आहे. त्यानुसार आज देवाची पूजा केली जाते. आणि उपवास ठेवून मनातील इच्छा व्यक्त केली जाते. तसेच, ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुमच्यासाठी नवीन संधी उपलब्ध झालेल्या दिसतील. तसेच, मानसिक तणावातून तुमची मुक्ती होईल. तुमची जुनी काही कामे राहिली असतील तर ती पूर्ण करता येतील. कोणताही निर्णय घेताना संयम बाळगा. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. आज तुम्ही केलेल्या जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. कुटुंबियांबरोबर आणि मित्र परिवाराबरोबर तुमचा चांगला वेळ जाईल. तुमची जुनी रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, तुमचा संपूर्ण दिवस सकारात्मक राहील. 

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या जीवनाची सुरुवात फार चांगली होईल. या कालावधीत तुम्ही काही शुभ कार्याची कामे सुरु करु शकता. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. मानसिकदृष्ट्या तुम्ही फार सक्षम असाल. नियमित योग आणि व्यायाम करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. आज मित्र परिवाराबरोबर तुमचे चांगले संबंध निर्माण झालेले दिसतील. जुने मतभेद दूर होतील. तसेच, तुम्हाला मानसिक शांती मिळेल. उत्पन्नाची नवी साधने तुमच्यासमोर खुले होतील. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवता येईल. अनेक आठवणींना उजाळा द्याल. तसेच, समाजात देखील तुम्हाला मान-सन्मान मिळेल. हाती घेतलेलं कार्य वेळेत पूर्ण कराल.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. आज तुमच्यातील कलागुणांना चांगला न्याय मिळेल. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच मनासारखी नोकरी मिळेल. भावनेच्या भरात चुकीचा निर्णय घेऊ नका. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. मात्र, व्यवसायाच्या बाबतीत तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागेल. तसेच, तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवून काम करावं लागेल. मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. शेअर बाजारात तुम्ही गुंतवलेल्या पैशांतून तुम्हाला लाभ मिळणार नाही. तसेच, राजकीय प्रकरणातही तुम्ही फसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना नीट विचार करा. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस भावनात्मक असणार आहे. आज तुम्हाला धार्मिक यात्रेत सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमच्या हातून अनेक चांगले कार्य घडतील. तसेच, संध्याकाळ नंतरचा काळ फार इमोशनल असण्याची शक्यता आहे. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक नवे मार्ग खुले होतील. तसेच, अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे आज पूर्ण करु शकता. तुमच्या करिअरला वेगळं वळण लागेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. भगवान हनुमानाची तुमच्यावर विशेष कृपा असल्यामुळे तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली असेल. तुमच्या अंतर्मनाला आज योग्य दिशा मिळेल. तसेच, करिअर आणि शिक्षणात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. मानसिक शांती लाभेल. आत्मविश्वास वाढेल. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Weekly Lucky Zodiac Signs : नोकरी, करिअर आणि पैसाच पैसा...पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींचे श्रीमंतीचे योग जुळून येतायत! कोणत्या राशी मालामाल होणार?