Weekly Lucky Zodiac Signs : 2025 हे वर्ष संपून आता नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यातील अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे 2025 वर्ष सरताना नेमका कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर नवीन वर्षाची सुरुवात कशी असणार आहे. या संदर्भात जाणून घ्यायची सगळ्यांनाच उत्सुकता असते. त्यानुसार, 29 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026 हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ राहील. या काळात, काही लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती, आर्थिक स्थिरता आणि नातेसंबंधांमध्ये नवीन ऊर्जा मिळू शकते. हा आठवडा (Weekly Horoscope) नेमका कोणत्या राशींसाठी भाग्यशाली असणार आहे ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी उद्यापासून सुरु होणारा आठवडा सकारात्मक असणार आहे. या काळात तुम्हाला करिअर किंवा पैशांशी संबंधित एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच, ज्या लोकांची अनेक दिवसांपासून कामे रखडली आहेत त्यांची या काळात कामे पूर्ण होऊ शकतात. या दरम्यान प्रवासाचे योगदेखील जुळून येणार आहेत.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी नवीन आठवडा बॅलेन्स साधण्याचा असणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक बदल घडताना तुम्हाला दिसतील. नवीन लोकांशी भेटीगाठी होतील. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. मुलांच्या कलागुणांना चांगला न्याय देता येईल.

Continues below advertisement

मिथुन रास (Libra Horoscope)

मिथुन राशीसाठी नवीन आठवडा आर्थिक भरभराटीचा असणार आहे. या काळात ऑफिस किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये तुमच्या बोलण्याला महत्त्व दिलं जाईल. तसेच, करिअरमध्ये तुम्हाला अनेक संधी चालून येतील. पार्टनरबरोबर तुमचा व्यवहार चांगला असेल. नेटवर्किंग क्षेत्रात तुमचा चांगला जम बसेल.

धनु रास (Sagittarius Saggitarius)

धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे. या आठवड्यात तुमच्या ध्येयावर तुमचं लक्ष केंद्रित असेल. तसेच, मुलांच्या कलागुणांना देखील तुम्हाला चांगला न्याय देता येईल. भविष्यात अनेक नवीन संधी चालून येतील. तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी नवीन आठवडा कृती करण्याचा आहे. आतापर्यंत तुम्ही जे काही सहन करत आला आहात त्यावर प्रतिकार करण्याचा आहे. तसेच, या कालावधीत तुम्ही भविष्यासाठी काही गुंतवणूक देखील करु शकता. त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

January 2026 Monthly Horoscope : जानेवारी महिना 'या' राशींसाठी संघर्षाचा; वर्षाच्या सुरुवातीला कोसळणार दु:खाचा डोंगर, एक एक पाऊल टाकताना राहा सावध