Horoscope Today 30 December 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 30 डिसेंबर 2025, आजचा वार मंगळवार आहे. लवकरच 2025 वर्ष संपणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षातले शेवटचे दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान गणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज एक वेगळ्याच स्वप्नाच्या वातावरणात रमाल, पराक्रम आणि प्रतिष्ठा वाढेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज लोकांच्या नजरेत भरण्याची यश मिळेल कलेला संधीची दारे उघडी होतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज वेगळीच स्फूर्ती आणि उत्साह देणारा दिवस व्यवसाय नोकरीत दुसऱ्यांवर दया दाखवाल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज आर्थिक फायदा मिळवण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतील
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज तुमच्या कल्पनांचे स्वागत होणार नाही, त्यामुळे थोडे विचारात पडाल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात, अशावेळी सारासार विचार करून वागणूक ठेवावी लागेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज साहित्य आणि वाङ्मयावर प्रेम करणारे आपल्या कल्पनाशक्तीचा विकास करतील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तुमच्या तडफदार व्यक्तिमत्त्वाला सखोल चिंतनाची साथ मिळेल, नवीन कल्पनांना जन्म द्याल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज बौद्धिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करू शकाल, व्यापारी वर्गाने सरकारी नियम आणि कायदे यांचे बंधन काटेकोरपणे पाळावे
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज नवीन कामे स्वीकारताना त्यातील तांत्रिक गोष्टींचा अंदाज घ्यावा
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांनी अति आत्मविश्वास बाळगू नये, आर्थिक दृष्ट्या फसवणूक होण्याची शक्यता आहे
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज स्वतःवर फार विश्वास न ठेवता योग्य दिशेने काम करायला हवे, कुठेही अंधविश्वास नको
हेही वाचा
2026 Shubh Yog: बिझनेसमध्ये मोठं प्रॉफिट... नोकरीत दुप्पट प्रगती.. 2026 च्या सुरूवातीलाच 3 राशींच्या पदरात सुख, शुभ लाभ दृष्टी योग..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)