Horoscope Today 3 January 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 3 जानेवारी 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार शनिवार आहे. हा दिवस शनिदेवाला (Shani Dev) समर्पित आहे. आजच्या दिवशी भक्त शनि मंदिरात जाऊन शनिची पूजा करतात. तसेच, आपल्या चुकीच्या कर्माबद्दल माफी मागतात. कारण शनिदेवाला आपण कर्मफळदाता म्हणतो. तो आपल्या कर्मानुसार सर्वांना फळ देतो. तसेच, ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. गणरायाच्या कृपेने तुमच्यासमोर आलेलं विघ्न लवकर टळेल. तसेच, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. फक्त तुमच्या प्रयत्नांत सातत्य ठेवणं फार गरजेचं आहे. त्यासाठी प्रयत्नशील राहा. संध्याकाळच्या वेळी गणेश मंदिरात जाऊन पूजा करणं शुभकारक ठरेल.  

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, वैवाहिक जीवनातही गोडवा टिकून राहील. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. 

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज दिवसभर तुम्हाला एखादी गोष्ट मनात सलत राहील. त्याची चिंता वाटेल. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस शुभकारक नाही. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. जे तरुण लग्नाचे आहेत त्यांच्यासाठी लग्नाचे प्रस्ताव येतील. कोर्ट कचेरीच्या संदर्भातील जुने वाद आज मिटतील. तसेच, तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. आरोग्याच्या बाबतीत चिंता करण्याची गरज नाही. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक ठरु शकतो. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला दिर्घकालीन आजार पुन्हा त्रास देऊ शकतो. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी बॉसचा ओरडा मिळण्याची शक्यता आहे. यासाठी आपले काम प्रामाणिकपणे करत राहा. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीचा आजचा दिवस अध्ययनात जाईल. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढलेली दिसेल. तसेच, शेअर बाजारात तुम्ही गुंतवून ठेवलेल्या पैशांतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. सकारात्मक गोष्टी तुमच्या आजूबाजूला घडताना दिसतील. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज व्यापारी वर्गातील लोक आपल्या कामातून चांगला नफा मिळवू शकतात. तुमचे वैवाहिक जीवनदेखील चांगले असणार आहे. आज तुमची महत्वाची कामे वेळेत पूर्ण करता येतील. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस साहस आणि परिश्रमाचा असणार आहे. आज तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी मिळवण्यासाठी तडजोड करावी लागेल. यामुळे तुम्ही निराश होऊ शकता. एखादं काम पूर्ण न झाल्यामुळे चिडचिड देखील होऊ शकते. मात्र, रागाच्या भरात कोणाला काहीही बोलू नका. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा असणार आहे. आज दिवसभरात तुम्हाला तणाव तसेच थकवा जाणवू शकतो. मनात खूप काही गोष्टी साठून आहेत. अशा वेळी योग्य मित्र-मैत्रीणीजवळ ते शेअर करा. अन्यथा त्या गोष्टी तुमच्या मनात राहतील. कामात मन रमणार नाही. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, तुमच्या घरात आनंदी वातावरण राहील. आज विविध स्त्रोतांमधून तुम्हाला धनलाभ देखील होऊ शकतो. आरोग्य एकदम उत्तम राहील. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असू शकतो. तुमच्या महत्त्वाच्या कामात दिरंगाई आल्यामुळे तुमचं मन नाराज होऊ शकतं. तसेच, हातातून पैसाही जाण्याची शक्यता आहे. अशा वेळ धैर्याने काम करा. तुम्ही जे काम करताय त्यात विश्वास आणि सातत्य असणं गरजेचं आहे

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. जर तुम्हाला एखादी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही बाप्पाच्या आशार्वादाने त्याची सुरुवात करु शकता. भविष्यात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, मित्र-मैत्रीणींचा सहवास तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी जानेवारीचा पहिला आठवडा चांगला की वाईट? कोणत्या राशी होतील मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य