Weekly Horoscope 5 To 11 January 2026 : ज्योतिषशास्त्रानुसार, नवीन वर्ष 2026 ला सुरुवात झाली आहे. या आठवड्याच्या पहिल्या आठवड्याला लवकरच सुरुवात होणार आहे. हा नवीन आठवडा अनेक राशींचं भाग्य उजळणार आहे. कारण या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे हा नवा आठवडा अनेक राशींसाठी (Zodiac Signs) भाग्यशाली असणार आहे. जानेवारी महिन्याचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? यासाठी तूळ ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

Continues below advertisement

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा पहिला आठवडा सामान्स असणार आहे. या आठवड्यात अहंकाराला वर्चस्व गाजवू देऊ नका. तसेच, इतरांशी कोणताही शब्द देण्याआधी तुमच्याकडून ती गोष्ट करणं शक्य आहे का याचा विचार करा. तसेच, तुमच्या व्यवसायातून तुम्हाला चांगला आर्थिक लाभ मिळेल. त्यामुळे आर्थिक स्थितीतही सुधारणा झालेली दिसेल. नवीन योजनांचा लाभ मिळेल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल.

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा चांगला जाणार आहे. या काळात आई-वडिलांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तुमच्या कामात चांगलं यश तुम्हाला मिळेल. तसेच, मित्र परिवाराचा सहवास तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. तसेच, देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळेल. तसेच, अनेक रखडलेली कामेही यावर्षी पूर्ण होतील. 

Continues below advertisement

धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)

धनु राशीसाठी जानेवारीचा पहिला आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तसेच, तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. एखाद्या नवीन कार्याची सुरुवात तुम्ही या आठवड्यात करु शकता. इतरांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तसेच, तुमच्या मेहनतीवर लक्ष केंद्रित करा. तसेच, योग्य गोष्टींना न्याय द्या. 

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा पहिला आठवडा कलात्मकतेचा असणार आहे. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, महत्त्वाचे निर्णय घेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. अनेक जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येऊ शकतात. तुमच्या करिअरमध्ये तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल.

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीसाठी आठवड्याची सुरुवात सकारात्मक असणार आहे. या काळात तुम्ही काही महत्त्वाच्या योजना राबवू शकता. तसेच, अनेक नवीन कल्पना तुमच्या डोक्यात येतील त्यावर काम करण्याचा प्रयत्न करा. तसेच, उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. नशिबाची साथ तुमच्याबरोबर असेल. तसेच, भविष्यात अनेक नवीन संधी तुम्हाला मिळतील.

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. या काळात तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, अनेक नवीन गोष्टी शिकाल. धार्मिक कार्यात तुम्हाला सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमच्या पार्टनरची तुम्हाला चांगली साथ लाभेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :

Mangal Gochar 2026 : मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर बदलणार मंगळ ग्रहाची चाल; 16 जानेवारीपासून 'या' राशींचं बॅंक बॅलेन्स वाढणार