Horoscope Today 3 January 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 3 जानेवारी 2026, आजचा वार शनिवार आहे. नुकतंच 2026 वर्ष सुरू झाले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आज नववर्षाचा पहिला शनिवारचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेवांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज तुमच्या सहवासात येणाऱ्या व्यक्तींना आनंदी आणि उत्साही कराल, घरामध्ये तुमचा चोखंदळपणा जाणवेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज तुमचा कलात्मक पिंड इतरांना जाणवेल, त्यामध्ये प्राविण्य व नावलौकिक लाभेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज घरामध्ये तुमची सौंदर्याभिरुची दाखवून द्याल, डोळ्याचे विकारासाठी योग्य वेळी औषधोपचार करायला हवेत
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज कापड धंदा, वाद्य वादन, टेलरिंग कलेशी निगडित व्यवसाय उत्तम चालतील
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज महिला बौद्धिक क्षेत्रात चमकतील, दुसऱ्यांना उत्तम सहकार्य कराल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज स्वतःची कामे सोडून लष्करच्या भाकरी भाजायला जाणार आहात, परंतु याची दखल न घेतली गेल्यामुळे नाराजी पदरात पडेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज व्यवहारात हजर जबाबीपणा दाखवाल, परंतु त्याला स्पष्ट वक्तेपणाची झालं असेल, त्यामुळे लोक दुखावले जाण्याची शक्यता
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तुमच्या हुशार आणि कल्पकतेमुळे यशाला खेचून आणाल, व्यवहारात थोडा विसरभोळेपणा केल्यामुळे महत्त्वाच्या कामांमध्ये दिरंगाई होईल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज रागावर ताबा ठेवणे आवश्यक ठरेल, लेखकांनी त्यांच्या लिखाणामुळे कुठले घोटाळे होणार नाही याची खबरदारी घ्यावी
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज महिलांनी फसवणुकीपासून जपावे, तुमच्या कामाला योग्य न्याय न मिळाल्यामुळे थोडे मागे पडाल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज सरकारी कामे मार्गी लागतील, नोकरी व्यवसायात वरिष्ठांची मर्जी कशी संपादन करता येईल याचा विचार करावा लागेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज तुमच्या दिलदार स्वभावाचे दर्शन लोकांना घडेल, सुख शांती समाधानाचा आनंद घ्याल
हेही वाचा
Shani Dev: टेन्शन संपलं..नववर्षात शनिदेवांच्या सर्वात प्रिय 2 राशींचं भाग्य फळफळलं! ग्रहांचे शुभ संकेत, वर्षभर संपत्ती, प्रगतीत वाढ, कमतरता नसेल..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)