Horoscope Today 2nd March 2024 Aries Taurus Gemini : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... 


मेष राशी  (Aries Today Horoscope) 


नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज कामाच्या ठिकाणी तुम्ही उत्साही असाल. तुमच्या कार्यक्षेत्रातील तुमची सर्व कामे पूर्ण करण्यात सक्रिय असाल, ज्यामुळे तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूप आनंदी असतील.


व्यवसाय (Business) -  तुमच्या व्यवसायात आर्थिक बाबतीत थोडे सावध असले पाहिजे.  कारण अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू 
शकते.


आर्थिक स्थिती  (Wealth) - तुम्हाला आर्थिक मदतीची गरज असेल तर तुमच्या लहान भावंडांकडून आर्थिक मदत घेण्याऐवजी तुम्ही तुमच्या वडिलांची किंवा मोठ्या भावंडांची मदत घेतली तर बरे होईल.


आरोग्य (Health) - छोट्या छोट्या गोष्टींसाठी औषधे घेत असाल तर बंद करा. औषधांच्या अती सेवनाने  किडनीशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला अधिक त्रास देऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो. 


वृषभ (Taurus Today Horoscope)   


नोकरी (Job) - नोकरी करणारे जे लोक व्यवस्थापनाशी संबंधित आहे त्यांचा आजचा  दिवस चांगला असेल. ग्रहांच्या पाठिंब्याने उद्या तुम्ही एखाद्या मोठ्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये किंवा कोणत्याही कंपनीत नोकरीसाठी अर्ज करू शकता, तिथून तुम्हाला नोकरीच्या ऑफरही मिळू शकतात.


व्यवसाय (Business) -  जे लोक किराणा व्यवसाय करतात, ते आज  ग्राहकांना भेटण्यात खूप व्यस्त असतील.  त्यांच्या मालाची विक्रीही खूप होईल आणि आर्थिक स्थितीही सुधारेल.तरुणांबद्दल बोलायचे झाले तर त्यांना कोणतेही काम करण्यासाठी जुन्या पद्धती योग्य वाटत नसतील तर ते त्यांच्या करिअरसाठी काही नवीन मार्ग शोधू शकतात. 


आरोग्य (Health) - आज डोकेदुखीची समस्या तुम्हाला खूप त्रास देऊ शकते. तुम्हीही एखाद्या समस्येत अडकू शकता, अशा समस्यांमध्ये तुम्ही काम करण्याऐवजी अधिक विश्रांती घ्यावी. विश्रांती घेतल्याने तुमच्या तब्येतीत थोडा आराम मिळेल.


मिथुन (Gemini Today Horoscope)  


नोकरी (Job) - आजचा दिवस थोडा त्रासदायक जाईल.  नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागू शकते. परंतु सर्व परिस्थितींचा सामना करून तुम्ही तुमचे काम पूर्ण करण्यात पुढे असाल, ज्याचे सर्वजण कौतुक करताना दिसतील.


व्यवसाय (Business) - तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करत राहा. कौटुंबिक वादामुळे  कोणताही निर्णय घेऊ नका.


आरोग्य (Health) -  जंक फूड किंवा बाहेरचे अन्न टाळले तर बरे होईल, अन्यथा तुमची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे पोटाच्या संसर्गाचा त्रासही होऊ शकतो.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हे ही वाचा :