Horoscope Today 29 April 2024 : पंचांगानुसार, आज 30 एप्रिल 2024, सोमवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा सोमवारचा दिवस  कसा राहील? आज तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


कोणत्याही गोष्टीबद्दल नाना तर्ककुतर्क संशय या गोष्टींना मनात आणू नका. संततीशी सुसंवाद साधावा लागेल. 


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


कोणताही नवीन निर्णय आज न घेतलेला बरा. वैवाहिक जीवनात मानलं तर सुख हे धोरण ठेवावे लागेल. 


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


जोडीदाराबद्दल जास्त अपेक्षा न ठेवलेल्या  बऱ्या.  महिलांना इतर व्यक्तींमुळे त्रास सहन करावे लागतील. 


कर्क रास (Cancer Horoscope Today)


घरापासून लांब प्रवासाचे योग येतील. मानापमानाच्या कल्पना जरा जास्त  टोकदार होतील.


सिंह रास (Leo Horoscope Today)


स्वतःचे हित अहीत जाणल्यामुळे रागाचा पारा जरा जास्तच वाढेल. कष्ट करायची तयारी  दाखवाल. पण ते मनापासून नसेल. 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


नोकरी व्यवसायात सहज कामे होतील. त्यासाठी नको त्या माणसाची मदत घ्यावी लागेल. 


तूळ रास (Libra Horoscope Today)


आज संधी चांगल्या येतील. कुटुंबाचे सहकार्य चांगले मिळेल. तुमच्या उदार वृत्तीमुळे सर्व परिस्थिती आटोक्यात येईल. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


आर्थिक लाभ चांगले मिळतील. कवी लेखकांना उस्फुर्त लेखनासाठी चांगला दिवस. 


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


कलाकारांना त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळेल. अतिभावना प्रधानता त्रासदायक ठरेल. 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


अति विचारामुळे डोकेदुखी निर्माण होऊ शकते. स्वतःला जेवढे खंबीर बनवाल तेवढी जास्त उभारी मिळेल 


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेशाशी संबंध येऊ शकतो. प्रकृती स्वास्थ्य चांगले लाभेल.


मीन रास (Pisces Horoscope Today)


हाताखालच्या लोकांकडून गोड बोलून कामे करून घेतली तर कामे लवकर मार्गी लागतील. महिलांना जवळच्या लोकांचे सहकार्य मिळेल


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Trigrahi Yog 2024 : 1 मे रोजी होणार ग्रहांचं मिलन! सूर्य, शुक्र आणि गुरुच्या संयोगामुळे त्रिग्रही योग; 'या' राशीच्या लोकांचं नशीब पालटणार