Trigrahi Yog 2024 : ज्योतिषशास्त्रात 9 ग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्रांना विशेष महत्त्व आहे. ग्रहांच्या संक्रमणामुळे (Transit) वेळोवेळी अनेक प्रकारचे शुभ योग तयार होतात, ज्याचा प्रभाव लोकांच्या जीवनावर पडतो. ग्रहांच्या संक्रमणामुळे वेळोवेळी शुभ आणि त्रिग्रही योग (Trigrahi Yog) तयार होतात. शुक्र ग्रह हा सुख आणि समृद्धी देणारा ग्रह म्हणून ओळखला जातो. हा ग्रह सध्या मेष राशीत भ्रमण करत आहे. तर, सूर्य देव देखील मेष राशीत आहे. तसेच 01 मे रोजी देवगुरु गुरू ग्रह मेष राशीत भ्रमण करणार आहे. यामुळे मेष राशीमध्ये (Aries Horoscope) त्रिग्रही योग तयार होईल. त्रिग्रही योगामुळे काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत. या योगामुळे अनेक राशींचं भाग्य उजळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी हा त्रिग्रही योग चांगला ठरणार आहे. मेष राशीच्या चढत्या घरात हा योग तयार होतोय. त्यामुळे तो अत्यंत शुभ मानला जातो. या योगामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल तसेच करिअरमध्येही चांगल्या संधी मिळतील. करिअर आणि बिझनेसच्या दृष्टीने मेष राशीत तयार झालेला त्रिग्रही योग खूप चांगला सिद्ध होईल. तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये वाढ होईल. कुटुंबात सुख-शांती नांदेल. तुम्हाला आर्थिक स्थितीत पूर्वीपेक्षा अधिक लाभ मिळेल. समाजात मान-प्रतिष्ठेत वाढ होऊ शकते.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग अतिशय अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या कुंडलीच्या दहाव्या आणि अकराव्या घरात हा योग तयार होत आहे. यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. तुमच्या करिअरमध्ये चांगलं यश मिळेल. गुंतवणुकीतून चांगला आर्थिक लाभ होईल. वडिलोपार्जित मालमत्तेतून तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग अतिशय शुभ आणि फलदायी असणार आहे. तुमच्या कुंडलीत कर्माच्या घरात हा योग तयार होत आहे. नोकरदार लोकांना नवीन नोकरीसाठी चांगली संधी मिळू शकते. पूर्वीच्या तुलनेत तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. तब्येतीत सुधारणा होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: