Horoscope Today 28 October 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ, मीन राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या....
मकर (Capricorn Today Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी सोमवार थोडासा चांगला ठरेल. दिवसाची सुरुवात अस्वस्थतेने होईल, नुकसानीच्या भीतीमुळे कोणतंही काम लवकर करावंसं वाटणार नाही. घरामध्ये काही समस्या निर्माण होतील, त्यामुळे धावपळ करण्याची परिस्थिती निर्माण होईल. आज नोकरी व्यवसायात जोखीम घेणं टाळा, समाधानी वृत्ती अंगीकारा. सहकारी समोरून चांगले असतील, पण मागून त्रास देऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम असेल आणि ते एकमेकांना मदत करण्यास तयार असतील. संध्याकाळी तुम्ही मुलांसोबत दिवाळीच्या खरेदीच्या मूडमध्ये असाल.
कुंभ (Aquarius Today Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा असेल. तुम्ही कधी आनंदी, तर कधी उत्साही दिसाल. आज सकाळपासूनच व्यावसायिकांना पैशाची चिंता असेल, पण हळूहळू उत्पादनाची चांगली विक्रीही होईल. पूर्वनियोजित कामातून कमी फायदा होईल आणि चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची संधीही मिळेल. नोकरदारांनी स्वतःच्या व्यवसायात लक्ष द्यावं आणि कोणत्याही वादापासून दूर राहावं. कुटुंबातील एखाद्याच्या असभ्य वर्तनामुळे शांतिचं वातावरण अचानक बिघडेल. सायंकाळनंतर तब्येत बिघडू शकते.
मीन (Pisces Today Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी सोमवारचा दिवस सामान्य राहणार आहे. घरातील वडीलधाऱ्यांच्या किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. नोकरदार लोकांवर आज कामाचा ताण जास्त असेल आणि ऑफिसकडून दिवाळी भेट मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना आज नशिबाच्या पाठिंब्याने इतर अधिक लाभाच्या संधी मिळतील. तुमच्या कामातील दिरंगाईमुळे कुटुंबातील सदस्य नाराज होतील. मुलांच्या काही कामामुळे धावपळ होण्याची परिस्थिती निर्माण होईल, तब्येतीचीही पूर्ण काळजी घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :