Pune News : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरुणीने आत्महत्या केली आहे. राहत्या फ्लॅटवर 9 व्या मजल्यावरुन उडी घेत तरुणीने आत्महत्या केली आहे. आत्महत्येच कारण अद्याप अस्पष्ट झालं आहे. 

Continues below advertisement


 पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरुणीने आत्महत्या केल्याने खळबळ


दरम्यान, या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुण्यातील बुधवार पेठेत अर्ध्या तासापूर्वी घटना घडली आहे.  पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरुणीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, आत्महत्या नेमकी का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.


नांदेडच्या इतवारामध्ये प्रेम प्रकरणातून निर्घृण युवकाची निर्घृण हत्या, इतवारा परिसरात खळबळ


नांदेडच्या इतवारा भागातील मिलिंदनगर मध्ये सक्षम ताटे या युवकाची निर्घृणपणे हत्या झाली आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याची तक्रार मृत मुलाच्या आईने दिली आहे. पिस्तूलातून गोळीबार करत मुलाची हत्या झाल्याची तक्रार पोलिसांना देण्यात आली आहे. मृत मुलाचे इतर समाजातील मुली सोबत प्रेम संबंध होते. त्यातून मुलीच्या कुटुंबीयांनी प्लॅनिंग करून हत्या केल्याचा तक्रारीत उल्लेख आहे. या प्रकरणी पोलिसांनी यातील मुलीचा भाऊ असलेल्या हिमेश मामीडवार सह दोघांना अटक केलीय. या घटनेमुळे इतवारा भागात एकच खळबळ उडाली आहे.


महत्वाच्या बातम्या:


Solapur News : दोन मित्रांनी गळ्याला दोरी लावली, आधी गोरख गेला, मग दु:ख सहन न झाल्याने सुरेशनेही जीवन संपवलं, सोलापूर हादरलं